10 lakh fraud of lawyer jalgaon fraud crime news esakal
जळगाव

Fraud Crime News : डीलरशीप देण्याच्या बहाण्याने वकिलाची 10 लाखांत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Fraud Crime News : इलेक्ट्रीक चार्जिंग बाईकचे शोरूम व डीलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने येथील एका वकिलाची सुमारे १० लाख ८० हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील दोन जणांविरुद्ध कासोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (10 lakh fraud of lawyer jalgaon fraud crime news)

येथील वकील वासुदेव धोंडू वारे (वय ४६) यांची निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील संजय दिनकर जिवरक व त्यांचा मुलगा महेश संजय जिवरक यांनी ६ नोव्हेंबर २०१८ पासून इलेक्ट्रीक चार्जिंग बाईक जीआयव्हीएस एक्स्पोर्ट ॲण्ड इम्पोर्ट प्रा. लि. ओझर सय्यद पिंप्री नाशिक येथील कंपनीतून फिर्यादी वासुदेव वारे यांना कासोदा येथे शोरूम टाकण्यासाठी २० गाड्या व डीलरशिप मिळवण्यासाठी फिर्यादी वासुदेव वारे यांच्याकडून १० लाख ८० हजार एवढी रक्कम घेऊन आजपर्यंत ना २० गाड्या दिल्यात, ना डीलरशिप दिली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे संजय दिनकर जिवरक व त्यांचा मुलगा महेश संजय जिवरक यांनी वासुदेव वारे यांची संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने ८ ऑगस्टला कासोदा पोलिसांत वासुदेव धोंडू वारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय दिनकर जिवरक व त्यांचा मुलगा महेश संजय जिवरक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धाराशिवमध्ये पोलीस अन् बुलढाण्यात मुख्याध्यापकाचा झेंडावंदनावेळी मृत्यू, अचानक कोसळले खाली

अभिषेक शर्मा बनला नवा 'हिटमॅन'! रोहित शर्माचा न्यूझीलंडविरुद्धचा मोठा विक्रम मोडला, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

Mexico Firing : फुटबॉल सामन्यावेळी बेछूट गोळीबार; ११ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी

पाकड्यांची मस्ती काही जात नाही! T20 World Cup स्पर्धेसाठी संघ जाहीर केला; तरी म्हणतात, आम्ही खेळूच असं नाही...

बापरे! मराठमोळ्या रिलस्टारचं निधन, प्रथमेश कदमच्या जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का, आई-मुलाची होती सुपरहिट जोडी

SCROLL FOR NEXT