जळालेले १०० रोहित्र मिळेना; रब्बी धोक्यात sakal
जळगाव

जळालेले १०० रोहित्र मिळेना; रब्बी पिके धोक्यात

शेतकरी हतबल : नादुरुस्त झालेले रोहित्र त्वरित उपलब्ध करून न दिल्यास आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : रब्बीचा हंगाम सुरू असताना महावितरणच्या(MSDECl) वतीने वीजबिल वसुलीसाठी एकीकडे रोहित्रे(transformer) बंद करण्यात आली. तर दुसरीकडे जवळपास जळालेली १०० रोहित्रे शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे तालुक्यातील रबीची पिके हातातून जाण्याची धोका निर्माण झाला आहे. सध्या येथील शेतकऱ्यांची(farmers) अवस्था एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी झाली आहे. नादुरुस्त रोहित्रे त्वरित बसवून न दिल्यास आंदोलनाचा इशारा भाजपने(bjp) दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यात महावितरणच्या वतीने वीजबिल वसुलीसाठी एकीकडे रोहित्रे बंद करण्यात आली. तर दुसरीकडे रोहित्र दुरुस्तीच्या नावाखाली नेण्यात आलेली जवळपास १०० रोहित्रे पुन्हा दुरुस्त करून देण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील रबीची पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे २५ ते ३० रोहित्रांची शेतकऱ्यांनी वीजबिलांची रक्कम भरली असताना त्यांना रोहित्र मिळत नसून, महावितरणच्या वतीने उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येथील गहू, हरभरा, मका, कांदा पिकांची पेरणी करून पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे.

शासनाने देखिल अतिवृष्टीची एका हाताने मदत केली तर दुसऱ्या हाताने वीजबिले वसुल करण्याची मोहीम हाती घेतली. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. याप्रश्नी लक्ष घालून तत्काळ रोहित्र उपलब्ध करून देण्याची मागणी महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या चार दिवसांत रोहित्र उपलब्ध झाले नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अस्मानी नंतर सुलतानी संकटाचा शेतकरी सामना करीत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत असून, महावितरणची वसुली शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी आहे. त्यामुळे बळिराजा हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने रोहित्र बसवून द्यावे, नसता आंदोलन करण्यात येईल.

- इद्रिस मुलतानी, प्रदेश चिटणीस, भाजप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT