bhusawal station
bhusawal station esakal
जळगाव

Jalgaon News : कोळशाच्या मालगाडीचे 102 दरवाजे उघडे; औष्णिक वीज केंद्राकडून रेल्वेशी पत्रव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जि. जळगाव) : तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीजकेंद्रात वीज (Electricity) निर्मितीसाठी मंगळवारी (ता. ७) नागपूरकडून दीपनगरमध्ये येणाऱ्या मालगाडीचे १०२ दरवाजे उघडे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (102 doors of coal freight train open for power generation at Deepnagar thermal power station jalgaon news)

याबाबत वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता (प्रभारी) प्रशांत लोटके यांनी सांगितले, की कोळशाने भरलेल्या मालगाडीचे मंगळवारी (ता. ७) सकाळी पावणेसातच्या दरम्यान १०२ दरवाजे उघडे असल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली.

तत्काळ सुरक्षारक्षक, मोस्कोगार्ड, एमएसएफ गार्ड घेऊन घटनास्थळी पोहचून रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी कोळशाचे ढीग लावण्यात आले होते. ते सुरक्षित राहण्यासाठी बंदोबस्त लावण्यात आला.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

कोळशाची उचल करण्यासाठी प्रशासनाने स्वतःच्या खर्चाने अंदाजे २४ ते २५ टन कोळसा जेसीबी मशीन व दोन ट्रॅक्टरद्वारे लावून वीजकेंद्रात वाहून नेला. तब्बल कोळशाच्या २५ व्हॅगन फोडणाऱ्या अज्ञात इसमांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आमचे कर्मचारी गेले आहेत, असेही लोटके यांनी सांगितले.

रेल्वेशी पत्रव्यवहार

जोपर्यंत रेल्वे इंजन औष्णिक वीजकेंद्रात पोचत नाही, तोपर्यंत रेल्वेची जबाबदारी असते. रेल्वेसोबत पत्रव्यवहार केलेला आहे. या आधी एक- दोन मोठ्या घटना घडलेल्या आहेत, असे वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT