Jalgaon : Office of Sakhi One Stop Center in Ganesh Colony.
Jalgaon : Office of Sakhi One Stop Center in Ganesh Colony. esakal
जळगाव

Sakal Special News : कौटुंबिक अत्याचार, प्रेम, फसवणुकीतून 116 महिलांना वाचविले

देवीदास वाणी

Jalgaon News : समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांवरील अत्याचार दूर व्हावेत, त्यांची प्रेमप्रकरणात फसवणूक झाल्यास, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करता यावी, यासाठी महिला, बालविकास विभागातर्फे ‘सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटर’ सुरू झाले आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या सेंटरद्वारे आतापर्यंत ११६ महिलांना न्याय देण्यासाठी मदत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फूस लावून पळवून आणलेल्या मुलींना पालकांच्या स्वाधीन करणे, कुमारीमाता प्रकरणी संबंधितावर पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (116 women saved from domestic violence love fraud Sakhi One Stop Centre open round clock for distressed women Jalgaon News)

जिल्ह्यात घडलेल्या कौटुंबिक हिंसाचारांपैकी ७७ प्रकरणांत या सेंटरच्या व्यवस्थापिका मनीषा पाटील, ॲड. राजश्री पाटील, समुपदेशक चित्रा पाटील, निवृत्त उपनिरीक्षक इंगळे यांनी संबंधित महिलांच्या सासरच्या मंडळींना बोलावून समुपदेशन केले. हिंसाचार केल्यास शिक्षा काय होते, समोपचाराने राहिल्यास काय फायदे होतात, याचे महत्त्व पटवून दिल्याने अनेकांनी समझोता केला आहे.

प्रेमप्रकरणात मुली परतल्या घरी

प्रेमप्रकरणात फसविल्या गेल्याची दहा प्रकरणी या सेंटरकडे आली होती. त्यात मुलींची मुलाने फसवणूक केल्याचे प्रकरणे होती. मुलींनी स्वतःहून या सेंटरकडे मदत मागितली. सेंटरच्या टीमने पोलिसांच्या मदतीने संबंधित मुलींना प्रियकराच्या तावडीतून सोडविले. विशेष म्हणजे, शिकलेल्या मुली या प्रेमप्रकरणात फसल्याची उदाहरणे आहेत.

२९ महिलांना निवारा

भांडणातून घरातून बाहेर पडलेल्या, घरातून काही कारणांनी पळून गेलेल्या महिला किंवा पळून आलेल्या, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त, अशा एकूण २९ महिलांना या सेंटरने निवारा दिला आहे. त्यात त्यांची राहण्याची व भोजनाची सोय केली आहे.

अनेक सुविधा एका छताखाली

या सेंटरमध्ये संकटग्रस्त महिला, युवतीस सर्व प्रकारची मदत केली जाते. त्यांना मोफत वैद्यकीय सेवा, कायदेशीर सेवा, व्हिडिओ कान्फरसिंगद्वारे सुविधा, विविध शासकीय योजनांचा लाभ, मनोधैर्य योजनेतून मदत, पोलिसांची मदत, मोफत समुपदेशन, अत्याचारग्रस्त व गरजू महिला, पीडित महिलांचे बालक, १८ वर्षांखालील मुलींना मोफत निवासाची सोय होते.

चोवीस तास सेवा

सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटर गणेश कॉलनीत आहे. चोवीस तास कार्यालय सुरू असते. महिला केव्हाही केंद्रात ०२५७-२९९८३११ या क्रमांकावर फोन करून मदत मागू शकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केंद्रात दाखल झालेल्या केसेस अशा

कौटुंबिक हिंसाचार - ७७

कोर्टात दाखल केसेस -२९

इतर - ३४

प्रेमप्रकरणे - १०

बालसंगोपन - ६

मालमत्ता वाद - ५

सायबर क्राइम - १

विनयभंग - ५१

पॉक्सो अंतर्गत - ४

विधिसेवा - ५

‘फेसबुक’वरून प्रेम, लग्न, त्रास

दापोली (जि. रत्नागिरी) येथील एका मुलीशी जळगावच्या एका मुलाने फेसबुकवरून मैत्री केली. नंतर प्रेमप्रकरण करून लग्नही केले.

तिला दिवस जाऊन मुलगी झाली अन्‌ तिचे मुलाच्या घरी सासरच्या मंडळीने हाल केले. तब्बल तीन वर्षांनंतर तिने वडिलांशी संपर्क साधून आपबिती सांगितली. त्यांनी जळगावच्या वन स्टॉप सेंटरला दुपारी चारला फोन करून मुलगी फसविली गेली.

त्यातून तिला बाहेर काढण्याची मागणी केली. अवघ्या चार तासांत सेंटरप्रमुख मनीषा पाटील, चित्रा पाटील, ॲड. राजश्री पाटील, उपनिरीक्षक इंगळे, केसवर्कर पूजा बडगुजर, दीपाली धनगर यांनी मुलीला मुलाच्या तावडीतून सोडवून तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले.

"सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटरमध्ये एकाच छताखाली संकटग्रस्त महिलांना मदत केली जाते. महिलांनी न घाबरता आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिल्यास त्यांना मदत करू. २४ तास सेंटर सुरू असते. पळून जाणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. त्यांनी आपल्या मागे मुलांचे काय होईल, याचा विचार करावा."

-मनीषा पाटील, केंद्र व्यवस्थापक

पालकांनी आपल्या मुलांनी मित्र म्हणून वागावे. ते काय करताहेत, याकडे लक्ष द्यावे. घरात सर्वांनी एकमेकांत संवाद ठेवावा. समाजात चांगले काय व वाईट चालले आहे, याची जाणव करून द्यावी.यामुळे मुली सतर्क होतील."

-चित्रा पाटील, समुपदेशक

"घरात सर्वांमध्ये संवाद महत्त्वाचा आहे. आई-वडिलांनी मुला-मुलींशी मित्र, मैत्रीण म्हणून वागावे. त्यांना सवयी लावताना आपण त्या का लावत आहोत, हेही सांगावे. मुलांना करिअर महत्त्वाचे असल्याची जाणीव करून द्या."

-ॲड. राजश्री पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT