meat  esakal
जळगाव

Jalgaon News : मुक्ताईनगरला 15 मांस विक्रेत्यांची दुकाने हटविली; पोलिस बंदोबस्तात कारवाई

शहरातील परिवर्तन चौकाकडून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर उघड्यावर मांस विक्रेत्यांची दुकाने होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील परिवर्तन चौकाकडून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर उघड्यावर मांस विक्रेत्यांची दुकाने होती. मुक्ताईनगर ही संतांची भूमी असल्याने संप्रदायातील वारकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या.

वारंवार नोटीस देऊनही ही दुकाने हटविली जात नव्हती.(15 shops of meat sellers were removed from Muktainagar by police jalgaon news )

अखेर शनिवारी (ता. २३) सकाळी अकराला नगरपंतायतीने बऱ्हाणपूर रस्त्यावर उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर १५ विक्रेत्यांची दुकाने पोलिस बंदोबस्तात हटविली. तसेच आठवडे बाजार येथील मटन मार्केट येथे हलविली. ही कार्यवाही मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

अनेक वर्षांपासून परिवर्तन चौकातून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनधिकृत मांस विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. काही विक्रेते मांस विक्रीनंतर उरलेले टाकाऊ अवशेष रस्त्याच्या किंवा दुकानाच्या बाजूला टाकतात. त्यामुळे दुर्गंधी सुटते. दरम्यान मध्य प्रदेशकडून मुक्ताईनगरला येणाऱ्या या मुख्य रस्त्यावरून वारकरी व भाविकांचा कायम वावर असतो.

त्यामुळे उघड्यावरील मांस विक्री थांबवावी, अशी मागणी नागरिक व वारकरी संप्रदायाकडून पालिकेकडे झाली होती. शनिवारी सकाळी अकराला पालिकेच्या पथकाने अचानक मोहीम राबवून उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिस बंदोबस्तात १५ दुकाने हटविली. आठवडे बाजार येथील मटन मार्केट येथे हलविली.

ही कार्यवाही सकाळी अकरापासून दुपारी दोपर्यंत सुरु होती. ही कार्यवाही मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या वेळी नगर पंचायत अधिकारी दीपक जग्रवाल, श्रीपाद मोरे, अच्युत नीळ, सचिन झिने, नगरपंचायत कर्मचारी सुनील चौधरी, रोहित महाजन, अनिल तायडे, गोपाल लोहेरे, मनीष धामणे, राजू सपकाळ, गोविंदा तेजी, जितेंद्र बग्गन, मनोज ढेनवाल व इतर सफाई कर्मचारी उपस्थित होते.

..तर पुन्हा होणार कारवाई

मुक्ताईनगर नगरपंचायतीने धडक कारवाई करून उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या १५ विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. मात्र पुन्हा या ठिकाणी मांस विक्रीची दुकाने थाटलेली आढळून आला. त्यांच्या विरोधात पुन्हा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh : कामगार, शेतकरी संघटनांकडून उद्या भारत बंद ; बँक, शाळा, महाविद्यालये अन् बाजारपेठा सुरू राहणार का?

T20 World Cup Super 8s Scenario : अफगाणिस्तानने थरारक लढतीत आफ्रिकेचा घाम काढला, पण सामना गमावला; आता सुपर ८ मध्ये कसे पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

Malvan ZP : ठाकरे शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ; मालवण तालुका हातून निसटला, युतीने मिळविली निर्विवाद सत्ता

लिव्हर ट्रान्सप्लांट टाळायचंय? आयुर्वेदात आहे यकृत रक्षणाची ताकद, केवळ मद्यपानच नाही 'या' चुका ठरतात कारणीभूत

Life Numerology : 'या' महिन्यात जन्मलेले लोक असतात दीर्घायुषी; किती शारीरिक त्रास होऊदे, तरीही जास्त वर्षे जगतातच

SCROLL FOR NEXT