Covid 19 Nasal Vaccine esakal
जळगाव

Jalgaon Covid Vaccination : ज्येष्ठांनी घेतली नाकातून कोविड प्रतिबंधक लस; 150 लस उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नाकातून देण्यात येणारी कोविड प्रतिबंधक १५० इनकोव्हॅक लस महापालिकेच्या दवाखाना विभागात उपलब्ध झाल्या आहेत. पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. २८) सहा जेष्ठ नागरिकांना त्या देण्यात आल्या. (150 vaccines of covid are available in municipal hospital department jalgaon news)

शनिवारी (ता. २९) दुपारपर्यंत या लस देण्यात येणार आहेत. त्यामुळे ६० वर्षांवरील नागरिकांनी महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांनी केले आहे.

यापूर्वी ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, अशा ६० वर्षांवरील नागरिकांना त्या लस दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या सात दवाखान्यांमध्ये ही लस दिली जाणार आहे. शाहूनगरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगरमधील (कै.) डी. बी. जैन दवाखाना, रिधूर वाडा भागातील (कै.) भागवत खंडू सोनवणे प्राथमिक विद्यालय, पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, सिंधी कॉलनी परिसरातील चेतनदास मेहता हॉस्पिटल, मास्टर कॉलनीमधील म. मो. मुलतानी दवाखाना, पिंप्राळा हुडको परिसरातील सुरेशदादा जैन प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस दिली जाणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सहा जणांनी घेतला डोस

छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये २ जणांनी लस घेतली, तर रिधूर वाडा भागातील (कै.) भागवत खंडू सोनवणे प्राथमिक विद्यालय, पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नानीबाई अग्रवाल हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी दोन जणांनी, असे एकूण सहा जणांनी 'इनकोव्हॅक' लस घेतली.

लस घेताना ही घ्या काळजी

लस घेण्याआधी नाश्ता किंवा जेवण करून यावे, बुस्टर डोस दुसऱ्या डोसच्या ६ महिन्यानंतर घ्यावा, लस घेण्यासाठी येताना मोबाईल व ओळखपत्र (आधार कार्ड) सोबत आणावे, असे आवाहन महापालिका दवाखाना विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

Latest Marathi News Updates : सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुनावणी सुरू

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT