Transport officer at RTO office attaching reflector to tractor trolley. Along with DySP Rakesh Jadhav and others.  esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेरला 165 ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर; DYSP राकेश जाधव यांची संकल्पना

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : अपघात घडू नयेत व मानवी जीवन वाचावे, या उद्देशाने उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या संकल्पनेतून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेल्या १६५ ट्रॅक्टर्स व ट्रॉल्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), जळगाव यांच्या सहकार्याने रिफ्लेक्टर लावण्यात आले. (165 tractors and trolleys were fitted with reflector in collaboration with RTO amalner Jalgaon news)

जवळपास ट्रॅक्टर ट्रॉलींना इंडिकेटर नसतोच, त्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आदळून मोठे अपघात होतात. त्या अपघातात कुणाचा तरी जीव जातो. जर ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावले तर मागून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशझोतात ते रिफ्लेक्टर परावर्तीत होईल आणि अपघात घडण्याला आळा बसेल, पर्यायी मानवी जीवन वाचेल.

सोमवारी बाजाराचा दिवस असल्याने बाजार समितीमध्ये मका विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून ट्रॅक्टर्स आले होते. मात्र क्वचित ट्रॉली वगळता बहुतांश ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावले नव्हते. याची दखल घेत सहज फाउंडेशनने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावचे मोटार वाहन निरीक्षक हेमंत सोनवणे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली.

हेमंत सोनवणे यांनी तत्काळ कार्यतत्परता दाखवत त्यांनी सहायक मोटार वाहन निरीक्षक तुषार मोरे, वाहतूक निरीक्षक जे. डी. नाईकडा, चालक संजय रंधे या टीमसह अमळनेर बाजार समिती गाठली आणि १६५ ट्रॅक्टर ट्रॉलींना उच्चदर्जाचे आरटीओ मान्यताप्राप्त रिफ्लेक्टर लावून दिले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, सहज फाउंडेशनचे सचिव रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

"परिवहन आयुक्त विवेक भिमानवार आणि डेप्युटी आरटीओ श्‍याम लोही यांच्या मार्गदर्शनांतर्गत रस्ता सुरक्षा कार्यक्रम हाती घेत असतो, अपघात कमी करून अगदी शून्यापर्यंत यावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. परंतु हे शक्य होण्यासाठी लोकसहभाग, लोकचळवळीच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे आणि अशीच लोकचळवळ सहज फाउंडेशन निर्माण करत आहे. असेच रस्ता सुरक्षा विषयक महत्त्वाचे कार्य त्यांनी सुरू ठेवावे, आमचे सर्वतोपरी सहकार्य सहभाग त्यांना मिळत राहील." - हेमंत सोनवणे, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओ कार्यालय, जळगाव

"रस्ता सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. सहज फाउंडेशनकडून हा लहानसा प्रयत्न आहे. याचे अनुकरण सर्वांनी केल्यास या संकल्पनेला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास अपघात टळून नक्कीच मानवी जीवन सुरक्षित होण्यास मदत होईल." - राजेश जाधव, अध्यक्ष, सहज फाउंडेशन, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT