amrut scheme esakal
जळगाव

Amrut Yojana : ‘अमृत’च्या पहिल्या टप्प्यात 18 हजार नळांना पाणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘अमृत’ योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अठरा हजार नळांना पाणी सुरू झाले आहे.

ज्या ठिकाणी कनेक्शन देण्यात आले आहे, तसेच चाचणीही पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी स्वत: आपल्या मुळ जोडणीला अमृत योजनेची जोडणी करून घ्यावी, असे अवाहनही महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. (18 thousand taps of first phase of Amrit scheme have been started jalgaon news)

शहरातील अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात काही भागातील जोडणी पूर्ण झाली आहे. नळद्वारे पाणीही सुरू करण्यात आले आहे. शहरात एकूण ८० हजार नळकनेक्शन आहेत, त्यापैकी १८ हजार नळाना ‘अमृत’योजनेचे पाणी सुरू झाले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

यात खेडी, सुप्रीम कॉलनी, जयनगर, जुने गाव, शिवाजीनगर या भागांत पाणी सुरू करण्यात आले आहे. साधरणत: २५ टक्के भागात आता ‘अमृत’योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे.

तीन दिवस चाचणी

अमृत’योजनेंतर्गत मूळ जलवाहीनीतून घरगुती नळ कनेक्शन जोडून देण्यात आले आहे. निळ्या नळीचे कनेक्शन दारापर्यंत आणून देण्यात आले. या नळीद्वारे पाणी येत असल्याची चाचणी महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. तीन दिवस चाचणीनंतर नागरिकांना नळ कनेक्शन जोडून घेण्याबाबत सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नागरिकांनी खासगी प्लबंरकडून हे कनेक्शन आपल्या घरगुती कनेक्शनला जोडून घ्यावयाचे आहे. त्यासाठी महापालिकेचे कोणतेही कर्मचारी येणार नाहीत, असेही पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

साठ हजार प्रतिक्षेत

शहरात तब्बल साठ हजार नळ कनेक्शन अद्यापही जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. यातील काही पहिल्या टप्प्यातील आहेत. त्या ठिकाणी काम सुरू आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या पिंप्राळा रेल्वे लाईनखालून जलवाहीनी टाकण्याचे काम बाकी आहे. त्याचे पैसेही रेल्वेला भरण्यात आले आहेत.

त्यांच्याकडून मंजूरी मिळाल्यानंतर हे काम सुरू करण्यात येईल. तसेच, दुसऱ्या टप्प्यात अनेक भाग आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे काम झाल्यानंतर संपूर्ण ८० हजार नळांना अमृत योजनेचे पाणी मिळणार आहे. परंतु, दुसरा टप्पा अद्यापही तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यावरच अडकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT