Accidental death of two youth from Shirud in Surat esakal
जळगाव

Jalgaon : शिरूड येथील 2 तरुणांचा सुरत येथे अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

शिरूड (जि.जळगाव) : येथील दोन तरुणांचा सुरत येथील पांडेसरी भागात निर्मानाधीन इमारतीमध्ये काम करीत असताना १६ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना शुक्रवारी (ता. १६) सकाळी अकराच्या सुमारास घडली.(2 amalner youths died after falling from 16th floor in Surat jalgaon latest marathi news)

सुरत येथील पांडेसरा भागात एका सतरा मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी शिरूड (ता. अमळनेर) येथील रहिवासी नीलेश प्रल्हाद पाटील (वय २८) व आकाश सुनील बोरसे (वय २३) हे दोघे लिफ्ट बसविण्याचे काम करीत होते.

आज सकाळी १० ते ११ च्या दरम्यान इतर मजुरांसोबत नीलेश व आकाश काम करीत असताना एकाच शिडीवर उभे राहून दोघांचे काम सुरू असताना अचानक शिडी सरकल्याने १६ व्या मजल्यावरून दोघे खाली पडले व दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना उपस्थित कामगारांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले.

दरम्यान, नीलेश व आकाश हे दोघे मित्र असून काही दिवसांपूर्वीच शिरुड येथून सुरतला आले होते. सुरतमध्येच ते मजुरीची कामे करीत असल्याने सध्या सुरत येथेच वास्तव्यास होते. मयत आकाशच्या पश्चात आई, वडील व भाऊ आहे. तर नीलेशच्या पश्‍चात वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. दोन्ही तरुण मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिरूड गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT