crime news  esakal
जळगाव

Jalgaon News : नशिराबादला 2 गट भिडले 14 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नशिराबाद (ता. जळगाव) : येथे किरकोळ कारणावरून दोन जणांमध्ये वाद झाले. त्याचे पर्यावसन दोन गटांत तुंबळ हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही गटांतील १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

येथील बोगद्याजवळ रविवारी (ता. २५) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास दुचाकी अचानक समोर आल्याने लोकेश नारखेडे याचे काका रमेश नारखेडे यांनी ‘गाडी व्यवस्थित चालव’, असे चालकाला सांगितले. त्याचा राग आल्याने बाचाबाची व शिवीगाळ होऊन दोन गटांत लाथाबुक्यांनी व कमरेच्या पट्याने हाणामारी झाली. (2 groups clash at Nasirabad Riot case against 14 persons Jalgaon Crime News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

याप्रकरणी लोकेश नारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या गटातील मुजाहिद खान रऊफ खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील रऊफ खान इनायत खान उभे असताना, पूर्वीच्या वादावरून ७ ते ८ जणांनी त्यांना खाली पाडून मारहाण केली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चिघळलेले वातावरण बघता अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, बाजारपेठचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश भोये, स्वप्नील नाईक आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या १४ लोकांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके तपास करीत आहेत. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT