Jalgaon Crime News esakal
जळगाव

जळगाव : पुन्हा 2 सराफ व्यापाऱ्यांना कामगाराने लुटले

रईस शेख

जळगाव : अवघ्या दोन दिवसांपूर्वीच एका बंगाली कामगाराने भंगाळे गोल्ड या सराफ पेढीला (Jewelry shop) गंडविल्याचा (Fraud) प्रकार समोर आला. यानंतर परत दोन सराफ व्यापाऱ्यांना बंगाली कामगाराने गंडविले आहे. सराफा पेढीसाठी १५ वर्षांपासून सोने- चांदीचे दागिने (Gold Silver jewelry) तयार करणाऱ्या कारागिराने विश्वास संपादन करून मारोती पेठेतील दोन सराफ व्यापाऱ्यांची ५ लाख ७४ हजार रुपयांत फसवणूक केली आहे. (2 jewellers businessman were robbed by bengali workers Jalgaon crime News)

मारोती पेठेतील सुशांत तारकनाथ भुतका (वय ४२) यांचा सोने चांदीचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बापन मंटू कारक (वय २८ रा. पश्चिम बंगाल) १५ वर्षांपासून सोने- चांदीचे दागिने बनवित होता. बापन याने विश्वास संपादन करून घरबांधकामासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत कारखान्याचे मालक सुशांत भुतका यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये घेतले. यादरम्यान त्याने दीपक संघवी यांच्याकडूनही ३ लाख १४ हजार रुपये दागिने बनिवण्यासाठी घेतले होते. एके दिवशी बापन कारक दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेतला. मात्र, मिळून आला नाही. त्याच्याशी संपर्कही झाला नाही.

सुशांत भुतका यांच्याकडून घेतलेले २ लाख ६० हजार रुपये व दीपक संघवी यांचे ३ लाख १४ हजार रुपयांचे दागिन परत न करता दोघा व्यापाऱ्यांची एकूण ५ लाख ७४ हजार रुपयांत बापन कारक याने फसवणूक केली. पैसे व दागिने परत मिळत नसल्याने तब्ब्ल दोन महिन्यानंतर सुशांत भुतका यांनी बापन कारक याच्याविरोधात शनिपेठ पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी (ता. ७) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

अखेर तेजश्रीने करून दाखवलंच! 'वीण दोघातली...'ची टॉप ५ मध्ये एंट्री; स्टार प्रवाहच्या या मालिकांचा TRP घसरला, कोण कितव्या स्थानी?

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

SCROLL FOR NEXT