Thief esakal
जळगाव

2 लाखांचे ठिबक सिंचनाचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास

प्रवीण पाटील

सावदा (जळगाव) : चिनावल (ता. रावेर) येथील शेतकरी दामोदर लक्ष्मण नेमाडे यांच्या वडगाव शिवारातील शेतातून दोन लाखांचे ठिबक सिंचन साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे.

ही घटना शनिवारी (ता.२८) रात्री घडली. चिनावल - उटखेडा रस्त्यावरील सुकी नदीला लागून असलेल्या वडगाव शिवारातील गट क्रमांक ८९ मधून चोरट्यांनी नऊ हजार केळी खोडाच्या ठिंबक नळ्या व सुमारे १५० पीव्हीसी पाइप, तसेच शेजारीच असलेल्या शरद हरी बोंडे यांच्या शेतातील पाइप चोरट्यांनी लंपास केले. लोहारा शेती शिवारातही ठिबक नळ्यांच्या चोरीची घटना समोर आली आहे.

चोरट्यांनी रात्री छोट्या वाहनाद्वारे या नळ्या व पाइप चोरून नेल्याचे दिसत आहे. परिसरात जुन्या नळ्या घेणारे व मोल्डिंगसाठी ठिबक कंपन्यांना विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची संख्या मोठी आहे, तर चोरी करून भंगार व्यावसायिकांना विकणाऱ्या टोळ्याही परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. पोलिसांनी या दृष्टीने तपास करण्याची मागणी होत आहे.

या संदर्भात निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, उपनिरीक्षक कोळंबे, विकास कोल्हे, रांका पाटील, रिजवान पिंजारी यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकरी दामोदर नेमाडे यांनी निंभोरा पोलिसांत तक्रार दिली आहे. या वेळी येथील शेतकरी दामोदर नेमाडे, श्रीकांत सरोदे , गोपाळ नेमाडे, सुहास सरोदे, राजू पाटील, संजीव महाजन, शरद बोंडे, शशिकांत भंगाळे, पीक संरक्षण संस्था चेअरमन गोपाळ पाटील, सेक्रेटरी दिलीप भारंबे घटनास्थळी व पोलिस ठाण्यात हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Autorickshaw Stop : जुन्या रिक्षा थांब्यांना हलविण्याचा प्रयत्न? चालकांचा संताप उसळला; ‘३०-४० वर्षांचा इतिहास एका दिवसात पुसणार?’

अहान- अनीत नाही तर 'या' ५५ वर्षाच्या बॉलिवूड अभिनेत्याला सगळ्यात जास्त केलं गेलं गूगल सर्च, कारण वाचून आठवेल फेब्रुवारी महिना

Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेअर करा खास संदेश

Putin-Modi Meet: क्रीडा आणि आरोग्यासह अनेक करार... पुतिन आणि मोदींच्या लक्षवेधी प्रतिक्रिया; भेटीत नेमकं काय घडलं? वाचा A टू Z अहवाल

लंडनच्या चौकात दिसणार राज आणि सिमरन! पुतळा अनावरणावेळी भावुक होत किंग खान म्हणाला...'कुणालाच कल्पना नव्हती की'

SCROLL FOR NEXT