Fraud Case News
Fraud Case News  esakal
जळगाव

जळके-लोणवाडी रस्त्यावर वृद्धाला गंडवले

रईस शेख्

जळगाव : तालुक्यातील जळके ते लोणवाडी रस्त्यावर दोन जणांनी ८० वर्षीय वृध्दाकडील सोन्याची चैन व अंगठी असा एकूण १ लाख २६ हजार रुपये किमतीचा ऐवज हिसकावला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मोहाडी रोडवरील दौलतनगर भागात शामराव तायडे (वय ८०) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. विद्युत मंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शेती करतात. लोणवाणी शिवारात त्यांची शेत जमीन असून दररोज याच मार्गाने त्यांचा वावर असतो.

सोमवारी (ता. ३०) रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शामराव तायडे दुचाकीने (एमएच १९ बीएस्स ५६३५) जळके येथून लेाणवाणीकडे निघाले होते. निर्जन रस्त्यावरील संदीप पाटील यांच्या शेताजवळ अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या मागून येत हात देत त्यांना थांबविले. भामट्यांनी वृद्धाची पोलिस स्टाईल उलट तपासणी करत या रस्त्यावर चोऱ्या-दरोडे जास्त वाढले आहे.

तुमच्या डिक्कीत काय नेताय. असे म्हणत सोन घालून कुठे फिरताय. तुम्हाला कळत नाही का, असे सांगत सोन्याची चैन व अंगठी रुमालात गुंडाळून गाडीच्या डिक्कीत ठेवण्यास बाध्य केले. शामराव तायडे यांनी सोन्याची अंगठी गाडीच्या डिक्कीत ठेवत असताना चोरट्यांनी रुमालात ठेवलेली सोन्याची चैन व अंगठी हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी शामराव तायडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

तिसरी घटना

एका खासगी बँकेचा व्यवस्थापक असलेल्या सुनील पाढळे हे २२ मार्च रोजी बचतगटांच्या वसुलीसाठी गेले असताना वराड-लोणवाडी रस्त्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील लाख रुपयांची रोकड लुटून नेण्यात आली होती. त्यानंतर लगेच १७ मे रोजी वेगळ्या एका बँकेची वसुली करणाऱ्या ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यावर चाकूने हल्ला चढवून त्यांच्या जवळून १ लाख २२ हजार १५८ रुपयांची रोकड हिसकावण्यात आली होती. या गुन्ह्यांचा तपास लागला नसताना आणखी एक लूटमारीचा गुन्हा घडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update : काँग्रेसला सीएएबद्दल खोटे बोलून दंगल घडवायची होती', पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला

Alia Bhatt: विराट अन् प्रियांकानंतर आता आलियाचा नंबर, ब्लॉकआऊट लिस्टमध्ये नाव सामील, पण ही यादी कसली?

Flight Ticket Price : दुबईपेक्षा देशांतर्गत विमान प्रवास महाग; ५० ते ६० टक्के भाडेवाढ, पर्यटकांना उन्हाळ्यात दरवाढीचे चटके

Singapore Air Forceच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, महिलांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून... वाचा या प्रकरणातील भारतीय कनेक्शन

SCROLL FOR NEXT