crime  esakal
जळगाव

Jalgaon fraud Crime : दिडशे रुपयात उज्ज्वला गॅस कनेक्शन; 200 महिलांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon fraud Crime : पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत उज्ज्वला गॅसचे कनेक्शन देण्याच्या नावे चौघा संशयितांनी शहरातील विविध भागात उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्याच्या नावे सुमारे २०० महिलांकडून प्रत्येकी दीडशे रुपये घेत कनेक्शन न देता फसवणूक केली. (200 women cheated due to fake ujjwala scheme jalgaon fraud crime news)

याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या महिलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.

शहरातील हरिविठ्ठल नगर, आशाबाबा नगर, खंडेराव नगर, अयोध्या नगर, गोपाळपुरा, आसोदा रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी संशयित कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (रा. रामेश्वर कॉलनी), राहुल गणेश सपकाळे (रा. सुप्रिम कॉलनी), विजय गंगाधर भोलाणे आणि किरण विजय भालाणे ( सर्व रा. बी.जे.मार्केट) या चौघांनी उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची बतावणी करीत तशा मजकुराचे स्टॉल आणि बॅनर विविध उपनगरांमध्ये लावत महिलांकडून रेशनकार्ड, आधारकार्ड, कागदपत्रांची झेरॉक्स व फोटो घेऊन १५० रुपये जमा केले.

मात्र अनेक दिवस उलटूनही कनेक्शन मिळत नसल्याने त्याबाबत महिलांनी संशयित यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले.

आपली फसवणूक केली जात असल्याचे लक्षात येताच महिलांनी शनिपेठ पोलिस ठाणे गाठत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT