RPF officers and personnel along with the girl found under Operation Nanhe Ferishte. esakal
जळगाव

Jalgaon News : रेल्वे विभागातील 205 ‘नन्हें फरिश्ते’ घरी परतले; मध्य रेल्वेचा उपक्रम यशस्‍वी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ऑपरेशन ‘नन्हें फरिश्ते’ अंतर्गत मागील सहा महिन्यांत ७३३ मुलांची सुटका केली. यामध्ये ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एकट्या भुसावळ विभागातून २०५ मुलांची सुटका आरपीएफ पोलिसांनी केली आहे.(205 children of Railway Department returned home Central Railway initiative successful jalgaon news)

रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत हरवलेल्या, घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे.

देशभरातील अनेक मुलांना शहराचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता विविध शहरात येतात. या रेल्वे स्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.

जीव धोक्यात घालून ‘मिशन रक्षा’

‘मिशन जीवन रक्षा’मध्ये आरपीएफचे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये आरपीएफ जवानांनी तीन जणांना वाचविले. तसेच बरेच प्रवासी रेल्वेत चढण्यासाठी किंवा स्थानक सोडण्याच्या घाईत अनेक वस्तु विसरतात. सप्टेंबरमध्ये अशा १२८ वस्तू ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत प्रवाशांना परत देण्यात आल्या आहेत.

तर ‘आरपीएफ’च्या जवानांनी सप्टेंबरमध्ये २३ लाख ७५ हजार ८४० किमतीचे ९५ किलो गांजाची ९ प्रकरणे आणि रुपये ७५ हजार १५० किमतीची ९ मद्य प्रकरणे नोंद केली. मध्य रेल्वेने ३ जणांच्या अटकेसह ४८३ कासवांच्या वन्यजीव जप्तीचे १ प्रकरण देखील जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT