b.t. seed esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : 28 लाख बी.टी. बियाणे पाकिटे येणार; तयारी खरिपाची...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पाच लाख ७० हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा होईल, असे सांगितले आहे. त्यानुसार कपाशीची २८ लाख १७ हजार ७१४ पाकिटांची मागणी केली आहे. (28 lakh B T Seed packets will arrive jalgaon news)

यंदा पावसाचा अंदाज कमी-अधिक प्रमाणात वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी बागायतदार शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. काहींनी जमिनीची वखरणी करून ठेवली आहे. मे महिन्यात कापूस बियाणे उपलब्ध झाल्यानंतर कपाशीचा पेरा करण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

आकडे बोलतात...

* कापसाचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र - चार लाख ९३ हजार ६७५ हेक्टर

* २०२२ मध्ये कापसाची लागवड - पाच लाख ७७ हजार ७९

* यंदा होणारी संभाव्य लागवड - पाच लाख ७० हजार

नॉन बी.टी.बियाणे पाकिटांची मागणी ३२ हजार २८६ आहे. एकूण २८ लाख ५० हजार कापूस पाकिटे मागविण्यात आली आहेत.

तालुकानिहाय उपलब्ध होणारी बी.टी. बियाणे असे

जळगाव - एक लाख ८३ हजार ९७७ पाकिटे

भुसावळ - ९२ हजार २१३

बोदवड - एक लाख आठ हजार ५३१

यावल - एक लाख १४ हजार ३८२

रावेर - ८८ हजार ९४५

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मुक्ताईनगर - एक लाख नऊ हजार ९९३

अमळनेर - दोन लाख ६२ हजार ५९६

चोपडा - एक लाख ९६ हजार सात

एरंडोल - एक लाख ४३ हजार ६३८

धरणगाव - एक लाख ४२ हजार ६३८

पारोळा - दोन लाख २४ हजार ९५७

पाचोरा - दोन लाख ५३ हजार २९८

चाळीसगाव - तीन लाख १६ हजार ३९०

जामनेर - चार लाख २९ हजार २६०

भडगाव - एक लाख २९ हजार २७०

एकूण - २८ लाख १७ हजार ७१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: नाराज इच्छूकांनी अर्ज माघारी घ्यावेत- हसन मुश्रीफ

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT