Bhusawal: Inspector of Railway Security Force along with the suspect who stole gold from Kurla and fled to West Bengal. K. Meena and co.
Bhusawal: Inspector of Railway Security Force along with the suspect who stole gold from Kurla and fled to West Bengal. K. Meena and co. esakal
जळगाव

Gold News : 28 लाखांचे सोने चोरुन पळणाऱ्याला पकडले; रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कुर्ला (मुंबई) येथून २८ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पश्‍चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने भुसावळ रेल्वे स्थानकावर मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

त्याच्याजवळ चोरलेला मुद्देमाल मिळून आला असून त्याला कुर्ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी, कुर्ला (मुंबई) येथील ४१/अ, देवी भवन, गोल बिल्डिंगमधील पहिल्या माळ्यावर मनोज मोहनलाल जैन यांचा सोन्याचे मंगळसूत्र तयार करण्याचा कारखाना आहे. (28 lakh gold thief caught Performance of Railway Security Force Jalgaon News)

या कारखान्यात काम करणारा कारागीर सुदाम निमाई समंता (वय २९, रा. हुगली, पश्‍चिम बंगाल) याच्याकडे श्री. जैन यांनी ४९८ ग्रॅम वजनाचे सुमारे २८ लाखांचे सोने मंगळसूत्र तयार करण्यासाठी दिले.

मात्र, संशयित सुदाम समंता याने लबाडीच्या उद्देशाने ते चोरुन नेत, पश्‍चिम बंगालमध्ये पळून जाण्यासाठी निघाला. हे श्री. जैन यांच्या लक्षात येताच, त्यांनी तत्काळ कुर्ला पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ सुदाम समंता याचा शोध सुरु केला असता, तो हावडा जाणाऱ्या रेल्वेने फरार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

त्यानुसार, कुर्ला पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश काळे यांनी कुर्ला येथील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. के. मीना यांना कळवले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. मीना यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. आर. तर्ड, श्रीकृष्ण कोळी, विनोदकुमार गुर्जर, इमरान खान, महेंद्र कुशवाह, सागर पकडे, दीपक शिरसाट यांना हावडाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये शोध घेण्यास सांगितले. कुर्ला येथील मीना यांनी भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा बलाचे आर. के. मीना यांना ही माहिती दिली.

त्यांनी तत्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना सूचित करून संशयिताचा कसून शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार, कर्मचारी प्रत्येक रेल्वेमध्ये शोध घेत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास आरपीएफ’चे जवान श्रीकृष्ण कोळी यांना भुसावळ स्थानकावर काळ्या रंगाच्या बॅगेसोबत एक संशयित आढळला.

त्याला ‘आरपीएफ’च्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणून त्याची कसून चौकशी सुरु केली असता ज्याचा कुर्ला पोलिस शोध घेत होते, तो संशयित सुदाम समंता असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे त्याने चोरलेले फिर्यादीने ४९८ ग्रॅम वजनाचे २८ लाखांचे सोने (३२ चैन) मिळून आले. त्याच्याकडील मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून त्याला कुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कुर्लाचे पोलिस उपनिरीक्षक सुशील इंगळे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT