Abuse of a girl child
Abuse of a girl child esakal
जळगाव

Jalgaon Crime News : घरी सोडण्याच्या बहाण्याने 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Jalgoan News : घरी सोडून देण्याच्या बहाण्याने नराधमाने सात वर्षीय चिमुकली अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे.

याबाबत येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे. (29 year old man raped seven year old child jalgaon crime news)

शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील रेल्वेस्टेशन रोड येथे चिमुकली ही कामानिमित्त आलेली होती. दरम्यान, घरी सोडून देतो, असे सांगून संशयित आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय २९, रा. नारायणवाडी, चाळीसगाव) याने स्कूटीवर बसून तिला शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर चिमुकली रडू लागल्याने तिला घरी सोडून देऊन ‘तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल’, अशी धमकी दिली. दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ कथन केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही धक्कादाय घटना घडल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील यांच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT