Accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News : कारच्या धडकेत यावलचे 3 जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : यावल येथील तीन तरुण कामासाठी जळगावला आले होते. काम आटोपून आपापल्या दुचाकीने घराकडे जात असताना, समोरून सुसाट कारचालकाने एकामागून एक दुचाकींना धडक दिली. (3 injured in car accident jalgaon news)

या अपघातात तीन जखमी झाले. यावलच्या आसारामनगरमधील अमृतराव बाबूराव बारी (वय ४०) रविवारी (ता. १४) कामानिमित्त जळगावला आले होते.

काम आटोपून दुपारी चारच्या सुमारास यावलला जळगाव-आसोदामार्गे ते जात असताना, आसोद्याकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या सुसाट कार (एमएच ४३, एएन २६९१) वरील चालकाने दारूच्या नशेत अमृत बारी यांच्या दुचाकीला (एमएच १९, एजी ४२४५) जोरदार धडक दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावरही कारचालक थांबला नाही, दुसरी दुचाकीला (एमएच १९, एसडी ६८८८) धडक दिली. यात दुचाकीवरील अमृत बारी, गणेश पंडित बाविस्कर आणि अश्रफअली मुजफ्फरअली सय्यद गंभीर जखमी झाले.

जखमींवर रुग्णालयात उपचार झाले. नंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरून तालुका पोलिसांत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

School Safety Issue: उटवदच्या जिल्हा परिषद शाळेसमोर 133 केव्ही तारा; 250 विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, वारंवार निवेदनांनंतरही महावितरणचे दुर्लक्ष

Jalna Tragedy: सावंगी तलाव येथे १० वर्षीय साईनाथचा सर्पदंशाने मृत्यू; वेळेवर उपचार न मिळाल्याने ग्रामस्थांचा रुग्णालयासाठी आक्रोश

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

SCROLL FOR NEXT