accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News: जामनेर-टाकळी रस्त्यावर भीषण अपघातात 3 ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील नागदेवता मंदिराजवळ झालेल्या अपघातात ‘बोलेरो’ जीपमधील तीन जण ठार झाले. जामनेर शहराकडून पहूरकडे जाणाऱ्या कंटेनर आणि जीपमध्ये समोरासमोर ही धडक झाली.

जामनेर-टाकळी रस्त्यावर सोमवारी (१८) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाल. मृत तिघेही संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील असल्याचे समजते. अद्याप मृतांच्या नावांची शहनिशा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (3 killed in horrific accident on Jamner Takli road jalgaon news)

जामनेरकडून पहूरकडे भरधाव निघालेल्या कंटेनरने समोरून येत असलेल्या बोलेरो जीपला धडक दिली. या भीषण अपघातात शेख समीर शेख नजीर (वय २०), अल्लाउद्दीन गयासोद्दीन शेख (वय ४०, दोघे रा. बालानगर, ता. पैठण, जि. संभाजीनगर) आणि बोलेरो जीपचा चालक साजन जगन बडोले (वय २५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला.

तिघेही जामनेरकडून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर-खंडव्याकडे जात होते. त्यांचा फळे विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर कंटेनर (क्रमांक आरजे ३२, जीसी ०७८९) वरील चालक फरार झाला आहे.

घटनास्थळी गर्दी

ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत दोघा मृतांसह गंभीर जखमीला उपजिल्हा रुग्णालयात आणले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेचे चालक जालम राजपूत, गणेश चौधरी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस उपनिरीक्षक जी. एम. अहिरे, सचिन सानप आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेसह जालमसिंग राजपूत यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वाहनातील दोघांचे मृतदेह व गंभीर जखमी असलेल्या एकाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT