Crowd of passengers at Amalner bus station during Diwali festival. esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेर आगाराला 40 लाखांचे उत्पन्न; प्रवाशांची एसटीला पसंती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील बस आगाराला दिवाळी चांगलीच शुभ ठरली असून, अवघ्या चार दिवसांत आगाराला ४० लाखांचे उत्पन्न मिळाले.

ऐन सणासुदीच्या दिवसांत एसटीला प्रवाशांची पसंती मिळाली असून, परतीच्या प्रवासालाही चांगला प्रतिसाद मिळाल्यास एसटीचे उत्पन्न अजून वाढणार आहे.(40 lakh income to Amalner Agar during diwali jalgaon news)

दिवाळीच्या पूर्वी आणि सुरुवातीचे दोन, तीन दिवस पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावतीकडून गावाकडे येणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. खासगी बसला किमान १५०० रुपये तिकीट द्यावे लागत होते. खासगी बस तसेच ट्रॅव्हल्सचे भाडे परवडणारे नसल्याने तसेच महिलांसाठी सवलतीच्या दरात तिकीट असल्याने प्रवाशांची संख्या एसटीकडे वळली.

त्या काळातच अमळनेर आगाराने लांब पल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस चालवल्या. प्रवासी वाढल्याने अमळनेर आगाराने बस फेऱ्या वाढविल्या आहेत. दिवाळीच्या चारच दिवसांत अमळनेर आगाराचे उत्पन्न अपेक्षित २० लाखावरून ४० लाखापर्यंत वाढले आहे.

अमळनेर आगाराने नाशिकसाठी ९ जादा बसेस सोडल्या आहेत. पुणे रातराणी २ जादा बसेस, मुंबई रातराणी एक जादा बस, सुरत ४ जादा बस, पुणे दिवसा ६ जादा बसेस तर चोपडा, धुळे दिवसाला १२ फेऱ्या वाढविल्या आहेत. तर जळगावला ९ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

दररोज सरासरी अमळनेर आगाराची एसटी २० ते २३ हजार किलोमीटर चालते व ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न मिळवत होती. मात्र दिवाळीच्या चार दिवसांत जादा बसेस सोडल्याने किलोमीटर आणि उत्पन्न देखील वाढले आहे.

वार............किमी...................उत्पन्न

सोमवार.......२६,९११.........८ लाख ४७ हजार २९७

मंगळवार.......२७,१३५........९ लाख ३५ हजार १४१

बुधवार.........२९, ६४५........१० लाख ८६ हजार ६९७

गुरुवार..........२९,०२४........११ लाख ११ हजार ९०१

''चार दिवसात ४३ फेऱ्या वाढवून एसटीने १ लाख १२ हजार ७१५ किमी प्रवास केला असून, एकूण ३९ लाख रुपये ८१ हजार ३६ रुपये इतके उत्पन्न मिळवले आहे. एसटीने प्रवाशांना गरजेप्रमाणे सुविधा दिल्या आहेत.''- इम्रानखान पठाण, आगार व्यवस्थापक, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT