crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वृद्धेला धडक देऊन 45 हजार लांबविले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : दिवाळीचा बाजार करण्यासाठी आलेल्या वृद्धेला मागून अज्ञात महिलेने धडक दिली. हातचालाकी करीत वृद्धेकडे असलेल्या पिशवीतून ४५ हजारांची रोकड लांबविले.

ही घटना शनिवारी (ता.११) दुपारी एकच्या सुमारास नवीपेठ परिसरात घडली. (45,000 stolen from old woman in market jalgaon crime news)

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बळीरामपेठेत गीताबाई श्रावण चौधरी या वास्तव्यास आहेत.

गीताबाई शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्याकडे कामाला असलेल्या रंजना प्रजापत यांच्यासोबत दाणाबाजार परिसरात दिवाळीचा बाजार करण्यासाठी गेल्या होत्या.

त्यांनी त्यांच्याकडे असलेली ४५ हजारांची रोकड कापडाच्या पिशवीत ठेवून ती पिशवी खांद्याला अडकवलेली होती. किराणा सामान घेण्यासाठी त्या दुकानात जात असताना त्यांना एका अनोळखी महिलेने मागून धक्का दिला.

यावेळी त्या महिलेने हातचलाखी करीत वृद्धेच्या खांद्याला असलेल्या पिशवीतून रोकड लांबवली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT