Police inspector Awhad and team with the two-wheeler thief.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रिकव्हरी एजंटकडून चोरीच्या 5 दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी एरंडोल येथून ताब्यात घेतले व त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या. (5 stolen bikes recovered from recovery agent Jalgaon Crime News)

चंद्रकांत रामदास साळुंखे (वय ४२, रा. हिराशिवा कॉलनी, जळगाव), असे संशयिताचे नाव आहे. तो खासगी कंपनीत लोन रिकव्हरी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

चंद्रकांत साळुंखे दुचाकींची चोरी कीरत असल्याची माहिती जिल्‍हापेठ पोलिसांना मिळाली. सीसीटीव्हीची धुंडाळणी करताना एका ठिकाणी चंद्रकांत साळुंखे आढळून आला. त्याचा अनेक दिवस शोध घेतल्यावर तो एरंडोल येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनी गुन्हे शोध पथकाला रवाना केले. पोलिस सहाय्यक फौजदार सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, पोलिस नाईक भारती देशमुख यांनी संशयित चंद्रकांत साळुंखे याला एरंडोल शहरातून ताब्यात घेतले.

सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयिताला पोलिस प्रसाद भेटताच त्याने गुन्ह्याची कबुली देत एका मागून एक, अशा पाच चोरीच्या दुचाकी काढून दिल्या. त्याची चौकशी सुरू असून, इतरही गुन्हे उघडकीस येणार असल्याचे निरीक्षक अव्हाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT