MLA Suresh Bhole, Commissioner Dr. Vidya Gaikwad and office bearers along with the appointed employees. esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेत 54 अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश

महापालिकेच्या ५४ अनुकंपाधारकांना महापालिका आयुक्तांनी नियुक्तीचे आदेश दिले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेच्या ५४ अनुकंपाधारकांना महापालिका आयुक्तांनी नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या या उमेदवारांना न्याय मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची संक्रांत गोड झाली आहे. ( 54 employees of Municipal Corporation ordered appointed by Municipal Commissioner jalgaon news)

महापालिका अनुकंपधारकांच्या प्रतिक्षा यादीत १२५ उमेदवार होते. त्यांपैकी १७ उमेदवार अपात्र ठरले तर १०८ उमेदवार पात्र होते. त्यांपैकी गट क मध्ये ३६ उमेदवारांना तर, गट ड मध्ये १८ उमेदवारांना विविध पदांवर नियुक्ती दिली.

आमदार सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमात नियुक्तीचे आदेश वितरित करण्यात आले. यामध्ये गट क मध्ये लिपिक-२३, वाहन चालक-५, कनिष्ठ अभियंता स्थापत्य-२, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी-१, कनिष्ठ अभियंता विद्युत-१.

रचना सहाय्यक-१, स्वच्छता निरीक्षक-१, संगणक तंत्रज्ञ १, दूरध्वनी चालक १ आणि गट ड मध्ये शिपाई-१४, मलेरिया कुली-२, भालदार चोपदार-१, माळी-१ आदी पदांवर नियुक्ती आदेश दिले आहेत.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त अविनाश गांगोडे, मुख्य लेखा परिक्षक मारुती मुळे.

मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे, सहा आयुक्त गणेश चाटे, सह आयुक्त अभिजित बाविस्कर, सह आयुक्त अश्विनी गायकवाड, वरिष्ठ लिपिक अर्चना वाणी आदी उपस्थित होते.

उर्वरित उमेदवारांबाबतही लवकरच निर्णय होईल, यासाठी आमदार भोळे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT