In the first month of the year, 'MPDA' weapon on two esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गेल्या वर्षी 56 कारवाया; आता अमळनेरचा माकू अन्‌ जामनेरचा भुऱ्या

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षभरात (वर्ष २०२३) गुन्हे शाखेमार्फत तब्बल ५६ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले होते.

वर्षाची सुरवात झाल्यावर हद्दपारीपाठोपाठ पोलिस दलाने जामनेरचा एक आणि अमळनेरचा दुसरा अशा रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. (56 criminals were booked through crime branch jalgaon crime news)

स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांपैकी अमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रमण ऊर्फ माकू बापू नामदास (वय २२, रा. मुठे चाळ, स्टेशन रोड, अमळनेर) याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात चार वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्यावर दोन प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात आल्या आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई करूनही हा गुन्हेगार नियंत्रणात येत नसल्याने व त्याच्या वागणुकीत सुधारणा होत नसल्याने अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्यातर्फे कारवाईबाबत दस्तावेज पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयास प्राप्त दस्तावेज आणि गुन्हे आलेख पाहता रमण ऊर्फ माकू याच्या स्थानबद्धतेबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या.

जामनेरचा दुसरा

जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार योगेश ऊर्फ भुऱ्या वसंत चव्हाण (३२, रा. बजरंगपुरा, ता. जामनेर) याच्याविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात सहा गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्यावर चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्याच्यात कोणत्याही स्वरूपाची सुधारणा झालेली नाही.

परिणामी, जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडून प्राप्त दस्तावेज आणि गुन्हे आलेख पाहता स्थानिक गुन्हे शाखेतील विशेष पथकाने स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.

आलेले दोन्ही प्रस्ताव तयार करण्यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील अशांच्या पथकाने दोन्ही प्रस्ताव अचूक तयार झाल्यावर पोलिस अधीक्षक, जिल्‍हाधिकारी यांच्या सूचनेनुसार दोन संशयितांना ताब्यात घेतले.

प्रस्तावांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष हजर केल्यावर जिल्‍हाधिकाऱ्यांनी दोन्ही प्रस्तावांना मंजुरी देत रमणला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाच्या स्वाधीन करण्यात आले; तर जामनेर येथील गुन्हेगार योगेशला ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडे सोपविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil Video: ''..अन् माझ्यासमोरच कसाब खो-खो हसायला लागला'', विश्वास पाटलांनी सांगितला कोर्टरुममधला अनुभव

Big Breaking : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय अन् टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी जाणार; ६ सामन्यांच्या तारखा जाहीर

Rahul Gandhi on Indore Contaminated Water: "इंदुरमध्ये सामान्य माणसाला पाणी नाही, विष दिलं गेलं अन् प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत राहिलं"

Kolhapur Election : डमी उमेदवारांचे ४८ अर्ज माघार; आज अखेरचा दिवस, कोल्हापूरमध्ये गर्दी-तणावाची शक्यता

Kolhapur Politics : घारीच्या तोंडावर कोल्हापूरमध्ये पाळत, पाठलाग अन् दबावतंत्र; राजकीय रणधुमाळी शिगेला

SCROLL FOR NEXT