crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बंद दुकानातून 59 मोबाईल लंपास; 2 संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : बंद दुकानाचा कडी-कोयंडा तोडून दुरुस्तीसाठी आणलेले ५९ मोबाईल, १६ हेडफोन आणि १०० टच पॅड असा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केल्याची घटना रविवारी (ता. ८) पहाटे अडीचला माळीवाडा भागात घडली.

चोवीस तासांच्या आत याच परिसरातील दोन संशयिताना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (59 mobile phones looted from closed shops 2 suspects in custody Jalgaon Crime News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

साजिदखान रशीदखान (रा. शाहआलमनगर) यांचे माळीवाडा भागात मोबाईल दुरुस्तीचे दुकान असून, त्यांनी दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल व इतर साहित्य ठेवून शनिवारी (ता. ७) रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून निघून गेले. चोरट्यांनी दुकानाचा कडी-कोयंडा तोडून ५९ वापरते मोबाईल, १६ हेडफोन, १०० टच पॅड असा ५२ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

मालकाने या परिसरात फिरणाऱ्या दोन व्यक्तींवर संशय व्यक्त केल्याने पोलिस कर्मचारी मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे यांनी मुजाहिद्दीन शेख रउफ (वय २३, रा. माळीवाडा), अमीन शेख अकील (वय २२, रा. शाहआलमनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ मुद्देमाल आढळून आला. पोलिस कर्मचारी संजय पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT