Fraud Crime News esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime: शर्वरी डाहरांची 60 लाखांची फसवणूक; दिरांसह, व्यावसायिक मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : पंजाबमधील राजपुरा येथील शर्वरी दीपक डाहरा या जळगावात ‘हेल्थ कन्सल्टंट’चे काम करतात. त्यांचे मोठे दीर अशोक रामचंद्र डाहरा, सुशील रामचंद्र डाहरा, त्यांचा व्यावसायिक मित्र राहुल सुदेशकुमार गुप्ता व त्यांचे वडील सुदेशकुमार लालचंद गुप्ता (दोघे रा. चंदीगड) यांनी तक्रारदार महिलेकडून ६० लाख रुपये घेतले. (60 lakh fraud of Sharvari dahra jalgaon crime news)

तसेच, त्यांची ‘स्टॅम्पपेपर’वर स्वाक्षरी घेऊन त्यांच्या पश्‍चात त्यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे व कोरे धनादेश घेऊन बनावट दस्तावेज तयार करीत त्यांची फसवणूक केली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावच्या माहेरवाशिणी शर्वरी या रिंगरोड परिसरात आई-वडिलांकडे वास्तव्यास आहेत. त्यांचा विवाह २५ जून २००७ ला राजपुरा येथील दीपक डाहरा यांच्याबरोबर झाला होता. त्यानंतर दीपक यांचे अपघाती निधन झाल्याने शर्वरी या मुलीबरोबर चंडीगड येथे राहत होत्या. डाहरा यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांनी पतीच्या सहाव्या हिश्‍श्‍याची मागणी केली.

त्यावर चर्चा झाल्यावर त्यांच्या मोठ्या दिरांनी शर्वरी यांना त्यांच्या मुलीसाठी दोन कोटी रुपयांचे घर खरेदी करून आणि कौटुंबिक मालमत्तेतील व व्यवसायातील वाटा हिस्सा स्वरूपात दिला जाईल, असे कबूल केले होते.

डाहरा यांचा व्यावसायिक मित्र राहुल गुप्ता याने चंडीगड येथील घर दाखविले होते. दीर अशोक यांनी गुप्ताला ४० लाख रुपये देऊन शर्वरी यांच्या नावावर ते घर करून देण्यास सांगितले होते. त्यामुळे डाहरा या त्या घरात राहून तेथे ‘हेल्थ कन्सल्टन्सी’ व्यवसाय करीत होत्या.

मित्राच्या मदतीने फसवणूक

शर्वरी डाहरा यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे खाते असलेल्या बँकेचे स्वाक्षरी केलेले दोन धनादेश, स्वाक्षरी केलेले महत्त्वाचे दस्तावेज, मौल्यवान कागदपत्रे व पासपोर्ट साईजची छायाचित्रे राहुल गुप्ता लबाडीच्या इराद्याने घेऊन गेला. तसेच, बनावट दस्तावेज तयार करून डाहरा यांचा विश्वासघात करीत फसवणूक केली. तसेच, त्यांच्या मुलीला ठार करण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी डाहरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT