MLA Mangesh Chavan discussing with the villagers. and Work started with the help of JCB.  esakal
जळगाव

MLA Mangesh Chavan : अतिदुर्गम गुजरदरीला मिळणार सुविधा; आमदार चव्हाणांच्या प्रयत्नातून 70 लाखांचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

MLA Mangesh Chavan : तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या अतिदुर्गम भागातील गुजरदरी गावाच्या विकासासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून, स्वातंत्र्यानंतर प्रथमच गावात रस्ता व इतर सुविधा मिळणार आहेत.

चाळीसगावहून गुजरदरी जाण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव, जातेगाव मार्गे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड व वैजापूर तालुक्याच्या सीमेवरून जवळजवळ ५५ किमी प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात साधा रस्ता व मूलभूत सुविधा गावकऱ्यांना मिळालेल्या नाहीत. (70 lakh rupees sanctioned for development of extremely remote Gujardari village jalgaon news)

अशा अतिशय खडतर भागात रस्त्यांसह सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रयत्न केले. गावासाठी युद्धपातळीवर सूत्रे हलविली. गावकऱ्यांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया

गावासाठी विकास निधी मंजूर केला नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा त्वरित सुरू झाली. आमदार चव्हाण यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांनी रस्त्याची पाहणी करून कामाला सुरुवात केली तसेच त्यांच्या निविदाप्रक्रिया देखील झाल्या आहेत.

विकास निधीच्या कामामधून, गावाचा सर्वात महत्वाचा असणारा गुजरदरीहून लोढरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरण कामासाठी ५० लाख रुपये, गावांतर्गत रस्ता सुधारणा करण्यासाठी १० लाख रुपये, गावात सभामंडप उभारण्यासाठी १० लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुविधा

पावसाळा सुरू असल्याने कामाला सुरुवात करता येत नव्हती. मात्र गावाच्या मागणीनुसार त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना तत्काळ रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुपले व हेमंत चौधरी तसेच कंत्राटदार शिरसाठ यांनी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच नितीन पाटील व गावकऱ्यांसोबत रस्त्याची पाहणी केली.

त्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे अनेक दशकानंतर प्रथमच गुजरदरी गावाला जवळपास २ किमीहून अधिक रस्ता तयार करून मिळणार आहे. तसेच ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजनेतून पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख रुपये, ब्लोक, अंगणवाडी बांधकामासाठी रोजगार हमी योजनेतून ११ लाख रुपये असा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT