8 feet statue of Gautama Buddha to be installed on 19 march jalgaon news
8 feet statue of Gautama Buddha to be installed on 19 march jalgaon news esakal
जळगाव

Buddha Statue : शहरात 8 फुटी बुद्धांची मूर्तीची स्थापना होणार!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील प्रबुद्धनगरातील २४ हजार हजार स्क्वेअर फूट परिसराच्या नालंदा बुद्धा विहारमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची आठ फुटाच्या अष्टधातूची सोन्याचा मुलामा असलेल्या मूर्तीची स्थापना रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराला होणार आहे,

अशी माहिती भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संदीप शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. (8 feet statue of Gautama Buddha to be installed on 19 march jalgaon news)

बौद्ध धम्मगुरू पूज्य भन्दत सुगतवंस महाथेरो, भन्दत करूनानंद थेरो, भन्दत ज्ञानरक्षीत थेरो, भन्दत धम्मबोधी थेरो, भन्दत संघरत्न थेरो, भन्दत एन. धम्मानंद थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थापना होइल. या वेळी पाच ते सहार धम्म उपासक, उपासिकांची उपस्थिती राहील.

जळगाव शहरात प्रथमच २४ हजार स्क्वेअर फूट जागेवर भव्यदिव्य नालंदा बुद्धविहार उभारण्यात आले आहे. शहरातील सर्वांत मोठा परिसर असलेल्या जागेत सर्वांत उंच भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना होणार आहे.

रविवारी (ता. १९) सकाळी आठला धम्मरॅली निघेल. सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत भिक्खु संघाचे भोजनदान होईल. नंतर धम्मध्वजारोहण, बुद्ध रूपाची प्रतिस्थापना होईल. सकाळी साडेअकराला भिक्खु संघाची धम्मदेसना (धम्मसंस्कार वर्ग) होईल. दुपारी दोनला सार्वजनिक भोजन होईल.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महापौर जयश्री महाजन, ॲड. राजेश झाल्टे, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर कुलभूषण पाटील, मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, जिल्ह्यातील हजारो धम्मउपासक, उपासिका तथा बालक व बालिकांची उपस्थिती राहणार आहे.

पत्रकार परिषदेस अध्यक्ष संदीप शिरसाठ, हरिश्चंद्र सोनवणे, योगेश नन्नवरे, विलास यशवंते, प्रवीण सपकाळे, सतीश शिरसाठ व धम्मबांधव उपस्थित होते.

अष्टधातूंची गौतम बुद्धांची मूर्ती

तथागत भगवान गौतम बुद्धांची आठ फुटांची भव्य मूर्ती ही थायलंड येथून आणण्यात आली असून, अष्टधातू व सोन्याचा मुलामा असलेली गगन मलीक फाउंडेशनच्या सहकार्याने उपलब्ध झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT