esakal
जळगाव

Inspirational News : पोलिस भरतीत अमळगावकरांचा दबदबा! 8 जणांनी मिळवले यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे हे फार जिकरीचे झाले आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत पोलिस भरतीत अमळगाव (ता. अमळनेर) येथील तब्बल आठ जणांनी यश मिळवत गावाचा नावलौकिक केला आहे. (8 people from amalner succeeded in police recruitment jalgaon news)

हे आठही पोलिस जवान सामान्य कुटुंबातील असून, आता ते देशसेवेसाठी तयार झाले आहेत. यात दोन निवृत्त सैन्यदलातील जुळ्या जवान भावंडांचाही समावेश आहे, हे विशेष! जणू काही हे गाव आता पोलिसांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे.

अमळगाव येथील कुंभार कुटुंबातील नीलेश बुधा कुंभार, जयवंत संजय कुंभार, प्रशांत चुडामण कुंभार तसेच लोकेश दीपक पाटील, श्‍याम रामकृष्ण पारधी, सौरभ गुलाबराव कोळी या तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीत पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत चांगले गुण प्राप्त केले.

पर्यायाने त्याचे फलित म्हणून त्यांची निवडही झाली आहे. नीलेश कुंभार व जयवंत कुंभार यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वीटभट्टी व्यवसायावर असून, ते दोघे प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तसेच प्रशांत कुंभार याचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यानेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत यश मिळवले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्‍याम पारधी याची पोलिस वाहक पदावर निवड झाली असून, त्याचा एक भाऊ अगोदरच मुंबई येथे पोलिस दलातच कार्यरत आहे. अमळगाव ग्रामपंचायतीचे शिपाई असलेल्या दीपक पाटील यांचा मुलगा असलेल्या लोकेश याने चोपडा येथे फार्मसीचे शिक्षण घेताना पोलिस भरतीत यश मिळवले.

सौरभ कोळी याचे आई-वडील शेतीकाम करत असून, प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पोलिस भरतीची तयारी करून त्याने यश मिळवले आहे. यापैकी प्रशांत कुंभार याची बुलढाणा येथे तर इतर पाच जणांची मुंबई येथे निवड झाली आहे.

आता कागदपत्रे तपासणी व वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नियुक्ती मिळणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जुळ्या भावंडांचा असाही योगायोग!

जुळ्या भावंडांचा जन्म होणे ही निसर्गाची देण आहे. मात्र जन्मानंतर सारख्याच पद्धतीने दोन वेळा नोकरी मिळणे याला, नेमके काय म्हणावे? असा प्रश्न निश्चितच पडत असतो. याच पार्श्वभूमीवर अमळगाव येथील राजेश दिलीप पाटील (लव) व योगेश दिलीप पाटील (कुश) या जुळ्या भावंडांची सैन्यदलात सोबत निवड झाली होती.

दोघांनी सैन्यदलात १७ वर्ष सेवा देत दोन्ही भाऊ २०२१ मध्ये सोबतच निवृत्त झाले. त्यानंतर आता पुन्हा या जुळ्या भावंडांची ‘मुंबई पोलिस’ म्हणून निवड झाली आहे. या दोघांची माजी सैनिकांच्या कोट्यातून निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : खासदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी, सर्व ६ खासदार खूश : एकनाथ शिंदे

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT