Snake Bite Precaution  esakal
जळगाव

Snake Bite News : दिवसा नागरिकांना होणारे 85 टक्के सर्पदंश ‘विषारी’; वन्यजीव संरक्षण संस्थेचा निष्कर्ष

सकाळ वृत्तसेवा

Snake Bite News : गेल्या पाच वर्षांत वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी सर्पदंशाच्या सुमारे ५०० घटनांचे निरीक्षण नोंदविले. त्यात सर्वाधिक ३० टक्के सर्पदंश रात्री अंधारात, झोपेत असलेल्या नागरिकांना झाल्याचे दिसून आले.

उर्वरित ७० टक्के दंश विविध ठिकाणी वेगवेगळ्या कामावेळी झाले. दिवसा झालेल्या सर्पदंश घटनांत विषारी दंश सुमारे १५ टक्के, तर रात्री झोपेत झालेल्या सर्पदंश घटनांत विषारी सर्पदंशाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिसून आले. (85 percent of snake bite that occur during day are poisonous jalgaon news)

पावसाळा सुरू झाला, की सर्पमित्रांची ड्यूटी खऱ्या अर्थाने सुरू होते. एरवी वर्षभर एकेरी संख्येत येणारे रेस्क्यू कॉल पावसाळ्याच्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात येतात. अनेक कॉल ‘सर्पदंश झाल्याने मदतीसाठी या’ असे असतात. पावसाळा आणि हिवाळ्यात मध्यरात्री येणारे कॉल सर्वाधिक असतात.

साप मारताना, अडगळीत काम करताना, चारा काढताना, गोठा साफ करताना, बूट घालताना, अंधारात बाहेर जाताना अशा विविध प्रकारे सर्पदंश झाले आहेत. रात्री झोपेत सर्पदंश झालेल्या रुग्णांचा विचार केला, तर बहुतेक रुग्णांना साप चावला आहे, हेच समजत नाही. अचानक पोटात दुखू लागणे, मळमळ होणे, चावल्या ठिकाणी वेदना जाणवल्या, तेव्हा लक्षात येते, की काहीतरी चावले आहे.

बऱ्याच घटनांत मध्यरात्री दंश झाला आणि भल्या पहाटे जाणवले. अशा वेळी आम्हाला कॉल आला, तर आम्ही सर्वप्रथम त्या रुग्णाला तत्काळ हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देतो. मग तो दंश कोणताही असो. एकदा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला, की निदान होते आणि त्यावर तत्काळ उपचार केला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रात्री होणारे दंश १०० टक्के विषारी नसले, तरी बहुतेक धोकेदायक दंश ‘मण्यार’ या अतिविषारी सापाचे आहेत. ज्या-ज्या रुग्णांना सर्पदंश झाले, त्यात सर्वाधिक रुग्ण गरीब मजूर, बांधकाम ठिकाणी रखवालदार म्हणून राहणाऱ्या गरीब कुटुंबातील, जमिनीवर झोपणाऱ्या व्यक्तींना, लहान मुलांना झाले आहेत. अनेकदा मध्यरात्री झोपेत काही तरी चावते. मुलगा किंवा मुलगी आईला उठवते.

आई काय चावले ते बघते, पण मण्यारचे दात खूप लहान असल्याने त्याची खूण सहसा दिसून येत नाही. ‘किडा चावला असेल झोप’, असे म्हणत आई आपल्या मुलाला, मुलीला झोपवून देते. बऱ्याचदा तो खरंच एखादा कीटक असू शकतो; पण सर्प असल्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही रात्री होणाऱ्या दंशाला अपरिचित सर्पदंश समजतो. मण्यारसारखे विषारी साप निशाचर असतात. त्यामुळे हा दंश होण्याची शक्यता अधिक असते.

रात्री वातावरण अनुकूल असल्याने उंदीर, पाली, बेडूक बाहेर पडतात. त्यांच्या मागे मण्यार, नाग, घोणससारखे विषारी साप येतात.

एकंदरीत रात्री साप आढळणे, हे निसर्गाच्या नियमाला धरून आहे. रात्री विचरण करणाऱ्या सापाला धक्का लागला, की तो चावतो. बहुसंख्य घरांच्या दारांना उंबरठा नसतो. घर-जमीन समांतर असते.

अनेक ठिकाणी पार्टिशनचे फटी असलेले झोपडीवजा घर असते. काही पक्क्या घरात मण्यारचा दंश झाल्याच्या घटना आढळल्या, पण त्या घरात खिडकीजवळ शोभेची झाडे आढळून आली. आउटलेट पाण्याच्या पाईपला जाळी नसल्याचे दिसून आले. बाहेरच्या जमिनीच्या फटीप्रमाणे सापांना दाराची फट दिसते.

घरात उबदार वातावरण असते. यामुळे निशाचर विषारी साप घरात येतो आणि सर्पदंश होतो. मृत्यूच्या दाढेत नेणारे विषारी सर्पदंश थोडी काळजी घेतली व वरील चुका सुधारल्या, की टाळता येतात, अशी माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT