जळगाव

Jalgaon Crime News : कर्ज मंजुरीच्या अमिषाने 9 लाखांची फसवणूक; मोठ्या कंपन्यांच्या पॉलिसीज विकून गंडविले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : नामांकित फायनान्स कंपनीतून लोन मंजूर करून देतो, असे सांगून धरणगाव शहरातील एका व्यावसायिकाची ९ लाख १५ हजार ९८ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना मंगळवारी (ता. २६) समोर आली.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात बनावट नावे सांगून मोबाईलवरुन गंडवणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (9 lakh fraud on lure of loan approval jalgaon crime news)

तक्रारदार, व्यापारी जीवनराम आनंदाराम कुमावत (वय ४२) हे धरणगाव येथे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. गेल्या २७ मार्चपासून त्यांना त्यांच्या मोबाईलवर मिनाक्षी अग्रवाल, आलिया, रूही शर्मा, सुधीर सक्सेना अशा वेगवेगळ्या नावाने संपर्क करुन कर्ज प्रकरणासंबधी बोलणे झाले.

आम्ही देशातील नामांकित फायनान्स कंपनीतून लोन मिळवून देतो असे आमीष दाखवून त्या कंपनीसह अन्य कंपनीच्या पॉलीसी काढण्यास भाग पाडण्यात आले.

कुमावत यांनी विवीध कंपन्यांच्या पॉलिसी काढल्यावर आपल्याला कर्ज मंजुर होईल, अशी अपेक्षा होती. त्यानंतर २७ मार्च ते २६ सप्टेंबरपर्यंत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने एकुण ९ लाख १५ हजार ९८ रूपये मागवून घेतले.

त्याच्या मोबदल्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुमावत यांनी जळगाव सायबर पेालिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरुन सायबर पोलीसात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT