94 lakh fraud rule of giving part time job to young woman jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : पार्टटाईम जॉबच्या नावे पावणेसहा लाखांत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : निधी व अमित असे नावे सांगणाऱ्या दोन अनोळखी सायबर गुन्हेगारांनी एका तरुणीला पार्टटाइम जॉब देण्याचे आमिष देत ५ लाख ७९ हजार ७९४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे.

या प्रकरणी तरुणीने सायबर पोलिसात तक्रार दिली आहे.(94 lakh fraud rule of giving part time job to young woman jalgaon news )

भुसावळ शहरातील ओम पार्क येथील ३२ वर्षीय तरुणी परिवारासह वास्तव्याला आहे. १९ ऑक्टोबर रोजीपासून व्हाट्सअप व टेलिग्राम या सोशल मीडियावर निधी व अमित अशी नावे सांगणाऱ्या अनोळखी दोन भामट्यांनी तरुणीशी संपर्क साधून पार्टटाइम जॉब देण्याचे आमिष दाखविले.

त्यानंतर फ्लाइट बुकिंगचे टास्क पूर्ण करण्यासाठी खाते रिचार्ज करण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ५ लाख ७९ हजार ७९४ रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने मंगळवारी (ता.७) दुपारी ४ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत दोन जणांविरोधात तक्रार दिली आहे.

त्यानुसार अमित आणि निधी असे नावे सांगणाऱ्या व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT