Accident News Esakal
जळगाव

Accident News: दुर्दैवी! घरात वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच चिमुकलीचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये धक्कादायक घटना

अंकिता खाणे (Ankita Khane)

जळगावमध्ये दुख:द घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या दिवशी चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घरातील इतर सदस्य वाढदिवसाची जोरदार तयार करत होते, त्यावेळीच कुलरचा शॉक लागून मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुक्ताईनगरमधील सनान्से कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर मुक्ताईनगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतं आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये काल ही धक्कादायक घटना घडली आहे. जिजाईनगर भागातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहत असणाऱ्या मुलीला कुलरचा शॉक लागल्यामुळे तिचा वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुलीचा नववा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंबीय वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करत होते. याच सुमारास कुलरचा जबरदस्त शॉक लागल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला. वैष्णवी चेतन सनान्से असे या चिमुरडीचे नाव आहे.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वाढदिवसाच्या दिवशी ही घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केक कापण्यासाठी सगळे एकत्र आले, यावेळी वैष्णवी तयारी करून बसलेली होती. याचवेळी तिला कुलरचा तीव्र झटका बसला आणि त्यामुळे ती बेशुद्ध झाली. काही वेळात कुटुंबीयांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

Kolhapur Cleaning Cmpaign : दोन बोटींतून नदीतील कचरा बाहेर; आपदा मित्रांच्या धडाकेबाज कामगिरीने बदलला घाटाचा चेहरा

Igatpuri School Accident : इगतपुरीत Little Blossom शाळेच्या आवारात शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अंगावर घातली कार; CCTV फुटेज पाहिल्यावर पालकांचा संताप

Kolhapur Cleaning Cmpaign : अवघ्या अडीच तासांत दोन टन कचरा हटवला; पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा झळाळून निघाला!

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्त; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT