जळगाव

ट्रॅक्टरचे टायर फुटला आणि नाल्यात जाणून उलटला; अपघातात दोन जणांचा मृत्यू  

आनंन शिंपी

 मेहुणबारे: ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्यालगत नाल्यात जाऊन उलटल्याने त्याखाली येऊन चालकासह मजुराचा जागीच मृत्यू झाला. चाळीसगाव ते नांदगाव रस्त्यावरील हिरापूर रेल्वेस्थानकाजवळ हा अपघात झाला.

याप्रकरणी मृत चालकाविरुद्ध चाळीसगाव पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. खडकी येथील ट्रॅक्टरचालक सागर रमेश कोळी (वय २८) व रांजणगाव येथील मजूर बंडू भास्कर जाधव (वय ३२) अशी या दोघांची नावे आहेत. ट्रॅक्टरमध्ये माती घेऊन ते हिरापूरकडून चाळीसगावकडे येत होते. वाटेत अचानक ट्रॅक्टरचे टायर फुटले. त्या मुळे त्यावरील नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन उलटले.

ट्रॅक्टर खाली दोघी दाबले...

ट्रॅक्टरखाली सागर व बंडू हे दोघे दाबले गेले. गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर व ट्रॉली बाजूला करून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. खासदार उन्मेष पाटील हे करजगाव येथील लग्न सोहळा अटोपून चाळीसगावकडे परतत असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी लगेचच घटनास्थळी थांबून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस व रुग्णवाहिकेला कळविले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. याप्रकरणी नीलेश भास्कर जाधव (रा. रांजणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे तपास करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT