Action under MPDA against 2 in district jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जिल्ह्यातील दोन जणांवर महसूल प्रशासनाने एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश दिले.

निखिल ऊर्फ पिया सुनील कुडे (वय २४, रा. एम. जे. नगर, चाळीसगाव) व शेख चॉंद शेख हमीद (३८, दीनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी दोघांची नावे आहेत. (Action under MPDA against 2 in district jalgaon news)

निखिल वाळूमाफिया

निखिल ऊर्फ पिया सुनील कुडे २०१८ पासून चाळीसगाव तालुक्यात विनापरवाना अवैध वाळूची चोरी करून विक्री करीत होता. त्याच्यावर वाळू चोरीचे‌‌ पाच गुन्हे दाखल‌ होते. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलिस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी मान्यता दिली. एमपीडीए अंतर्गत त्यास एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

शेख चाँदवर गंभीर गुन्हे

शेख चाँद शेख हमीद‌ २०१५ पासून भुसावळ शहरात साथीदारांसह खून करणे, जबरी चोरी करणे, अनैतिक देह व्यापार करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, फसवणूक करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे, असे एकूण ११ गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत जळगाव पोलिस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याने त्याच्याविरोधात एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

आतापर्यंत २३ जणांवर कारवाई

एमपीडीए कायद्यांतर्गत नोव्हेंबर २०२२ पासून आजपावेतो गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २३ गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा व कोल्हापूर या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT