जळगाव

Jalgaon Crime News : सुप्रीम कॉलनीतील एकावर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : हातभट्टी दारूविक्रीसह वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुप्रीम कॉलनीतील आझाद बहादूर भाट यास ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

(Action under mpda against one in Supreme Colony jalgaon crime news)

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्या आझाद बहादूर भाट (वय ४१, रा. रामदेवबाबा मंदिराजवळ, सुप्रीम कॉलनी) याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे ११ गुन्हे होते. तसेच याआधी त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तरीही त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती.

त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला.

त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आझाद भाट याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, कॉन्स्टेबल विशाल कोळी, राहुल रगडे, हसीना तडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, जयंत चौधरी पंडित पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचा बालेकिल्ला सर केला! प्रशांत किशोरांचा विजय कसा शक्य झाला? विजयामागची 5 मोठी कारणं

Mumbai Crime: मामाचा राग भाच्यावर काढला, तरुणानं १ वर्षीय चिमुकल्याचं अपहरण केलं, डोंबिवलीत बंद रिक्षात सोडून फरार

Latest Marathi News Live Update : अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या युवकाला जीवदान

Latur News : एसआयआर मोहिमेत जळकोट तालुका राज्यात अव्वल; मतदार यादी पुनरिक्षणाचे १०० टक्के काम पूर्ण

ICC Bans Cricketer: ICC ची मोठी कारवाई! अमेरिकेच्या ‘या’ क्रिकेटपटूवर तब्बल ८ वर्षांची बंदी; नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT