again march conducted for demanding dr ambedkar statue remove case and action not taken by District Collector should be suspended jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : डॉ. आंबेडकरांचा पुतळा हटवल्यास तीव्र आंदोलन; दीक्षितवाडीतील वाद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दीक्षितवाडीतील बी. जे. मार्केटसमोरील जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्याचे कारस्थान रचणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून या प्रश्‍नावर भावना न समजून घेता मनमानी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) पुन्हा समाजबांधवांनी मोर्चा (March) काढला. (again march conducted for demanding dr ambedkar statue remove case and action not taken by District Collector should be suspended jalgaon news)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा संरक्षण समितीतर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. दुपारी पुतळ्याचे पूजन करून मोर्चाला सुरवात झाली. जळगाव शहरातून व भुसावळ तसेच अन्य भागांतूनही काही कार्यकर्ते मोर्चासाठी आले होते. विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार, म्हणून परिसरात चोख बंदोबस्त होता. या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चेकऱ्यांमधून काही प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान, जिल्हाधिकारी व काही पदाधिकाऱ्यांमध्ये शाद्बिक वाद झाल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

अशा आहेत मागण्या

पूर्वाश्रमीच्या बौद्ध वस्तीतील डॉ. आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांचा पुतळा हटवून जागा काबीज करण्याचे षडयंत्र आहे. ते रचणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, जळगाव महापालिकेने या जागेवर पुतळा नसल्याचा अहवाल देणे गंभीर असून, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, पुतळा हटविण्यासाठी पोलिस संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यातही हा पुतळा हटवू नये, अशा मागण्या करण्यात आल्या.

विविध प्रस्तावांवर चर्चा

या मोर्चात सहभागी कार्यकर्ते व समाजबांधवांतर्फे काही प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी मित्तल यांच्याशी चर्चा केली. जागा खासगी असल्याने संबंधित जागा मालकाला न्याय द्यावा लागेल, असा मुद्दा समोर आला. हे मान्य होणार नाही म्हटल्यावर पुतळा त्याच जागी राहावा, यासाठी समितीतर्फे निधी उभारून ही जागा खरेदी करावी अथवा महापालिकेस निवेदन देऊन जागेची मागणी करावी, या प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा झाली. मात्र, तोडगा निघाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

SCROLL FOR NEXT