Agitation by State Equality Teachers Council esakal
जळगाव

Jalgaon Agitation : 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वीसपेक्षा कमी पटसंख्येचा शाळा बंद करण्यात येऊ नयेत, त्यापेक्षा अत्याधुनिक शाळा करण्यावर भर देण्यात यावा, जीर्ण झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुसज्ज इमारती उपलब्ध करून द्याव्यात, सर्व शाळांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. २१) येथील महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे आंदेालन करण्यात आले.आंदोनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ, जिल्हाध्यक्षा प्रा. मनीषा देशमूख यांनी केले.

जिल्हा उपाध्यक्ष गणेश बच्छाव, अमळनेर तालुकाध्यक्ष बापूराव पाटील, महानगराध्यक्ष तुळशीराम पांढरे, सचिव वर्षा अहिरराव, उपसचिव भारती ठाकरे, अनंतकुमार सूर्यवंशी, नरेंद्र अहिरराव, सोपान भवरे, अजय भामरे, महेश पाटील, चिंतामण जाधव, राजेंद्र पारे, राज्य उपाध्यक्ष रावसाहेब जगताप आदींनी आंदेालनात सहभाग घेतला.(Agitation by Maharashtra State Samata Shikshak Parishad Jalgaon News)

निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्याचा आशय असा ः प्रत्येक शाळेत अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, पुरेसे क्रीडासाहित्य उपलब्ध करून द्यावे, सर्व प्राथमिक शाळांना आयसीटी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, डिजिटली क्लासरूम निर्मितीवर भर देण्यात यावा, सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक उपलब्ध करून द्यावे, टेक्नॉलॉजी बेस्ड शिक्षण उपलब्ध करून द्यावे, सर्वसाधारणपणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गरीब कुटुंबातून येतात.

यामुळे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात यावा, विविध संवर्गांनुसार शिष्यवृत्त्या सुरू करण्यात याव्यात, विनाअनुदानित धोरण बंद करून सर्व मान्यताप्राप्त शाळांना अनिदान देण्यात यावे, सकल उत्पन्नाच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च करण्यात यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT