Ajanta Caves Tourists flock to see the caves in the area esakal
जळगाव

Jalgaon : दिवाळीच्या सुटीनिमित्त अजिंठा लेणी ‘Housefull’

सकाळ वृत्तसेवा

तोंडापूर (ता. जामनेर) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत लेणीला पंधरा हजार पर्यटकांनी भेट दिली असून, पर्यटनाचा आनंद लुटला.

गेली दोन वर्षे कोरोना संकट ओढवल्याने येथील व्यावसायिक हातबल झाले होते. मात्र या दिवाळीच्या सुट्यांमुळे देशी पर्यटकांची संख्या वाढल्याने स्थानिक व्यवसायातही समाधानकारक वाढ झाल्याचे दुकानदारांनी सांगितले.(Ajanta Caves Housefull for Diwali Holidays tourist like to see world famous tourism spot caves Jalgaon News pvc99)

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या वाहनतळाच्या सुविधांमुळे दोन, तीन दिवसात दीड लाखावर उत्पन्न मिळाल्याचे महामंडळ व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. पार्किंगमध्ये फुल्ल झाल्याने जळगाव ते औरंगाबाद रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

लेणीतील उपहारगृह गर्दीने फुल्ल असल्याने त्यांच्याही उत्पन्न वाढ झाल्याचे व्यवस्थापक पाटील यांनी सांगितले. सोयगाव आगारातून लेणीसाठी बस चालवल्या जात असून, अपुऱ्या बस सेवेमुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तासन् तास बसची वाट पाहत बसावे लागत असल्याचे दिसून आले. बाहेरील बौद्ध भिक्कू संघही मोठ्या प्रमाणात लेणी दर्शनासाठी दिसून आले. देशी पर्यटक दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आल्याने ‘लेणी हाऊस फुल्ल’ झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'गाेपाल बदने, प्रशांत बनकरच्‍या पोलिस कोठडीत वाढ'; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायालयात नेमकं काय घडलं?

Sweet Corn Appe Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत स्वीटकॉर्न अप्पे, सोपी आहे रेसिपी

आता नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून! महापालिका निवडणुकीत 9 लाख तर झेडपीसाठी उमेदवारांना करता येणार 7.50 लाखाचा खर्च; पंचायत समितीसाठी 5.25 लाखांची मर्यादा

‘रन फॉर युनिटी’मध्ये आज सगळेच पोलिस धावणार! प्रत्येक पोलिस ठाण्याला फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याची घातली अट; पोलिसांकडून टी-शर्ट, फलकांची खरेदी

आजचे राशिभविष्य - 31 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT