Hatnur Dam  
जळगाव

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी वाहतेय दुथडी

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ (जि. जळगाव) : तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने गुरुवारी (ता. २२) रात्री दहाच्या सुमारास हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून १ लाख ६ हजार १२२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (All the 41 gates of Hatnur Dam have been fully opened due to flood in Tapi river)

जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात गुरूवारी (ता. २२) दिवसभर दमदार पाऊस झाल्याने रात्री दहाला हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यात हतनूर धरण क्षेत्रात गुरूवारी सकाळपासून दमदार पाऊस झाला. यामुळे धरण फुल्ल भरले असल्याने धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून १ लाख ६ हजार १२२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

३८ हजार हेक्‍टरला लाभ

धरणाची जलपातळी २०९.२१० मीटरपर्यंत पोचलेली असून, धरणात आज रोजी १७३.३० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४४. ६६ टक्के इतका जलसाठा आहे. या पाण्याचा भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर या तालुक्‍यातील ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीला लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी. एन. महाजन यांनी दिली आहे. पाटचाऱ्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी ३०० क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

Latest Marathi News Live Update: सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

या मूलांकाच्या लोकांपासून सावध राहा ! अंतर्ज्ञानी असतात हे लोक; भविष्यातील घटना आधीच समजतात

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT