marriage esakal
जळगाव

Jalgaon News : लग्नाचे आमंत्रण न दिल्याने मंडपात राडा; वधुपित्यास मारहाण

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (जि. जळगाव) : लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून लग्न मंडपातच राडा होऊन वधुपित्यास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील सुंदरनगर तांडा क्रमांक ३ येथे घडली. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (An incident of not being invited to wedding took place in wedding hall where bride got angry and beat bridegroom jalgaon news)

सुंदरनगर तांडा क्रमांक ३ येथील परशराम आनंदा राठोड यांच्या मुलीचे लग्न २६ मार्चला सुंदरनगर तांडा येथेच होते.

लग्नकार्य झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास जेवणाच्या पंगती बसत असतानाच गावातील संशयित देविदास हरदास राठोड, मोहनदास हरदास राठोड व शिवदास हरदास राठोड हे लग्नकार्याच्या ठिकाणी आले व सर्व गावाला लग्नाचे आमंत्रण दिले, आम्हाला आमंत्रण का आले नाही, आम्ही नातेवाईक नाहीत, असा जाब त्यांनी विचारला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

या वेळी गावातील काही लोकांनी लग्नात वाद घालू नका, असे सांगितले असता तिघांनी न ऐकता आरडओरड करत परशुराम राठोड यांना पकडून त्यांची कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी काही लोकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

या मारहाणीत परशराम राठोड यांना छाती, पोटावर मारहाण केली. तसेच दोन्ही हात पकडून जोरात पिरगळले. त्यात त्यांचा डावा हाताचा पंजा फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी परशराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात संशयित देविदास राठोड, मोहनदास राठोड व शिवदास राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT