Anganwadi worker esakal
जळगाव

Jalgaon Anganwadi Recruitment : महिलांसाठी सुवर्णसंधी! अंगणवाडी मदतनीस 68 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Anganwadi Recruitment : येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयामार्फत ६८ जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प एक अधिकारी सुनीता चव्हाण व प्रकल्प दोनच्या अधिकारी साधना कापडणी यांनी एका पत्रकान्वये प्रसिद्धीस दिली आहे. (Anganwadi Helper Recruitment for 68 Vacancies chalisgaon jalgaon news)

प्रकल्प एकमध्ये २६ गावांसाठी २७ व प्रकल्प दोनमध्ये ३० गावांसाठी ४१ महिला मदतनीस पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, येत्या बुधवारपासून (ता. १४) ते २७ जून दरम्यान शासकीय सुटी वागळून सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत कार्यालयात अर्ज विक्री होणार आहेत.

भरतीसाठी उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वयोमर्यादा १८ ते ३५ अशी अट असणार आहे तर विधवा उमेदवारास वयोमर्यादा ४० आहे. प्रकल्प एक कार्यालय अंतर्गत राजमाने, शिदवाडी, ढोमणे, पोहरे, भवाळी, खेडी खुर्द, बहाळ, कढरे, सुंदरनगर, विसापूर, दरेगाव, चिंचगव्हाण, भोरस बुद्रुक, दसेगाव, इच्छापूर, रहिपुरी, तामसवाडी, सेवानगर, ब्राम्हणशेवगे, पिंपळवाड निकुंभ, नांद्रे, माळशेवगे, मांदूरणे, पिंपळवाड प्लॉट, शिरसगाव या गावांसाठी प्रत्येकी एक जागा तर मेहुणबारे येथे दोन जागांसाठी भरती आहे.

प्रकल्प दोनसाठी चंडिकावाडी, मुंदखेडा बुद्रुक, मुंदखेडा खुर्द, पाटणा, पातोंडा, गणपूर, ओझर, शिवापूर, वलठाण पाटे, आंबेहोळ, सांगवी, रांजणगाव, रोकडे, तळेगाव, खरजई, न्हावे, तरवाडे, वडाळा, उंबरखेड, आडगाव, परशुराम नगर, टाकळी प्र दे, हातले, हिंगोणे खुर्द, वाघले, वाकडी, सोनगाव आदी गावांमध्ये प्रत्येकी एक जागा ते टाकळी प्र. चा., गोरखपूर, देवळी या गावांना प्रत्येकी दोन जागा अशा ३० गावांत ४१ पदांची भरती होणार आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तलाठी पदाची मेगा भरती

राज्यात मागील काही वर्षांपासून रखडलेल्या तलाठी पदाची भरती लवकरच सुरू होणार आहे. राज्य शासनाने ४ हजार ६२५ तलाठ्यांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील महसूल विभागाच्या नाशिक, पुणे, कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागांतील रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत.

राज्यात ४,६२५ तलाठी पदांची भरती ही १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच, उमेदवारांनी त्यांचे शिक्षण मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचेही चांगले ज्ञान असावे. तसेच, उमेदवारांना राज्य सरकारने घोषित केलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

Prakash Mahajan: मुंडे कुटुंबाचा वारस जाहीर करण्याचा अधिकार भुजबळांना नाही : प्रकाश महाजन

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT