Anil Patil
Anil Patil esakal
जळगाव

Anil Patil News : प्रथमच आमदार, मंत्री अन्‌ थेट पालकमंत्रीपद; अनिल पाटील यांना पालकत्व ठरणार फायद्याचे

कैलास शिंदे

Anil Patil News : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजिदादा गटाचे आमदार किशोर पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

प्रथमच निवडून येऊनसुद्धा मंत्रीपदी वर्णी आणि आता थेट पालकमंत्रीपदही मिळाले असून, मतदार संघालगतच्या नंदुरबार जिल्ह्याचे हे पद त्यांना मतदार संघाच्या दृष्टीनेही फायद्याचे ठरणार आहे.

अनिल भाईदास पाटील हे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Anil Patil will have benefit of constituency near guardian minister post jalgaon news)

पक्षाने त्यांना अमळनेर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली अन्‌ ते मोठ्या मताधिक्याने निवडून येत प्रथमच आमदार झाले. विशेष म्हणजे ते जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार होते.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ते त्यांच्यासोबत पक्ष सोडून बाहेर पडले. या निर्णयामुळे त्यांचा फायदा झाला अन्‌ त्यांना मदत व पुनर्वसन हे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यामुळे प्रथमच आमदार आणि मंत्रीपद असा लाभ त्यांना झाला. त्याचवेळी त्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार याची प्रतीक्षा होती.

दरम्यान, गेल्या १५ ऑगस्टला त्यांनी बुलढाणा येथे स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केले होते. त्यामुळे त्यांना बुलढाण्याचे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना नंदुरबारचे पालकमंत्रीपद देण्यात आले.

नंदुरबार जिल्हा हा त्यांच्या अमळनेर मतदार संघाच्या जवळ असल्याने त्यांना त्याचा निश्‍चितच लाभ होणार आहे. त्यांना काम करणेही सुलभ होणार आहे.

शिवाय नंदुरबार येथे पालकमंत्री म्हणून केलेली कामेही अमळनेरमधील मतदारांना दिसणार आहेत. विशेष म्हणजे याच नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेले शिरीष चौधरी यांनी अमळनेर मतदार संघात अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला होता. तर आता अमळनेरचे आमदार असलेले अनिल पाटील हे नंदुरबारचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे हा योगायोगच म्हणावा लागेल.

आव्हानात्मक काम

नंदूरबार हा आदिवासी जिल्हा आहे. त्यामूळे त्या ठिकाणी काम करण्याचे मोठे आव्हान श्री. पाटील यांच्या समोर आहे. आता ते आपल्या कौशल्याने पालकमंत्रीपदाचे हे आव्हान पेलणार काय? हे आगामी काळात दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT