A team of police and municipal corporation while breaking godown by JCB and confiscating leather stock  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गुदामावर छाप्यात जनावरांची कातडी जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील सुप्रिम कॉलनीत ममता बेकरीजवळील एका गुदामात शनिवारी (ता. ८) दुपारी जनावरांच्या कातडीचा मोठा साठा मिळून आला. (Animal hides were seized in raids on warehouse jalgaon crime news)

एमआयडीसी पोलिसांसह मनपाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गोदाम सिल केले आहे. कातडी जप्त करण्यात आली असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कातडीचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

याबाबत पोलिसांना नियंत्रणकक्षाच्या ‘डायल ११२’ या क्रमांकावरून गुप्त माहिती मिळाली होती. नियंत्रणकक्षाने तत्काळ एमआयडीसी पेालिसांना सतर्क केले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. महापालिकेच्या मटन मार्केट विभागालाही ही बाब कळविण्यात आली.

त्यानुसार मनपाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या व मनपाच्या पथकाने गोडावूनमध्ये पाहणी केल्यानंतर त्यांना हजारो जनावरांच्या कातडीची साठवणुक केल्याचे आढळून आले

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जेसीबीने तोडले गुदाम

पोलिसांसह मनपाच्या पथकाने कारवाई करून जेसीबी बोलावून गुदामाची भिंत तोडण्यात आली. याठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवून चाचणीसाठी कातडींचे नमूने घेण्यात आले. तसेच जप्त केलेली कातडी जमिनीत पुरविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, दीपक जगदाळे, विकास सातदिवे, पंकज पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे यांच्यासह आरोग्य अधीक्षक जितेंद्र किरंगे, आरोग्य निरीक्षक विशाल वानखेडे, अधीक्षक संजय ठाकूर, किशोर सोनवणे आदींच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT