Agar manager Sandeep Patil, Dilip Banjara, Sandesh Kshirsagar etc. while distributing android ticket machine in bus depot.  esakal
जळगाव

Jalgaon News : जळगाव बस आगारात अँड्रॉइड तिकीट मशिन; तिकीट काढणे झाले सोपे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रथम आल्यानंतरही येथील बस आगारातील वाहक तिकीट मशीन नसल्याने त्रस्त होते. एसटी संयुक्त कर्मचारी समितीने यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाला पत्र दिले होते.

जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी मुंबई येथे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे विभागातील जवळपास एक हजार ९७६ कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड मशिनचे वाटप सुरू झाले आहे. (Around 250 Android ticket machine were distributed in Jalgaon Agar news)

जळगाव आगारात जवळपास २५० तिकीट मशिनचे वाटप झाले. यापूर्वीचे ट्रायमॅक्स मशिन वारंवार खराब होत असल्यामुळे वाहकांना तिकिटाचा मॅन्युअल ट्रे वापरावा लागत होता. परिवहन महामंडळाच्या विविध सवलती देताना प्रत्येक प्रवाशास मोठ्या प्रमाणात तिकिटे मोजून द्यावी लागत होती.

यासाठी एसटी कर्मचाऱ्यास तारेवरची कसरत करावी लागत होती. बऱ्याचदा मार्ग तपासणी दलाकडून वाहकावर तक्रारी होण्याचे प्रकार झाले होते. एकूणच ट्रे बुकिंगची सवय नसल्यामुळे बहुतांश वाहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार झाल्यामुळे मुंबई कार्यालयाने त्याची दखल घेतली व जळगाव विभागातील वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट मशिन देण्याबाबत स्पष्ट आदेश दिले. अँड्रॉइड तिकीट मशिनमुळे वाहकाला तिकीट बुकिंग करण्यासाठी लागणारा वेळ मर्यादित स्वरूपात राहील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

झटपट तिकीट बुकिंग झाल्यामुळे प्रवासी उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून वाहकाला अतिरिक्त वेळ मिळेल. या तिकीट मशिनमध्ये अँड्रॉइड मोबाईलप्रमाणे विविध सुविधा असल्यामुळे प्रवासी एटीएम व इतर ॲपच्या माध्यमातून वाहकास तिकिटाचे पैसे देऊ शकतील.

जळगाव आगारात झालेल्या कार्यक्रमात विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्या हस्ते वाहकांना तिकीट मशीनवाटप झाले. जळगाव विभागाचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. दिलीप बंजारा व संदेश क्षीरसागर प्रमुख पाहुणे होते. गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मशिन मिळाल्यामुळे उपस्थित वाहकांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT