corona rules  sakal
जळगाव

जळगाव : कोरोनाच्या नियमाचे उल्लघंन करणाऱ्या आर्यन रिसॉर्टला ५० हजारांचा दंड

सावखेडा शिवारात महापालिका, पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या आर्यन इको रिसॉर्टमध्ये एका कंपनीचे सेमिनार होते. मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन गोंधळ झाला. पोलिसांना याबाबत माहिती प्राप्त होताच तालुका पोलिस ठाण्याचे पथक आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तरीत्या कारवाई केली. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मनपा पथकाने आयोजकांना ५० हजारांचा दंड केला.

सावखेडा शिवारातील आर्यन इको रिसॉर्ट येथे शनिवारी (ता. २२) दुपारी एका कंपनीचा सेमिनार होता. कार्यक्रमासाठी ५० लोकांची परवानगी असताना अचानक गर्दी झाली. रस्त्यावर आणि बाहेर वाहनांची व नागरिकांची खूप गर्दी दिसून येत असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. यावरून तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार लागलीच पथकासह त्याठिकाणी पोचले.

तसेच महापालिकेचे उपायुक्त श्याम गोसावी यांच्या पथकातील अतिक्रमण विभागप्रमुख संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, किशोर सोनवणे आणि तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक कल्याण कासार, उपनिरीक्षक सायकर, हवालदार वासुदेव मराठे, विश्वनाथ गायकवाड, अनिल तायडे, मनोज पाटील, अशोक पाटील यांच्यासह केलेल्या पाहणीत कार्यक्रमाला २०० पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती असल्याचे आढळले. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून मनपाने आयोजकांना ५० हजार रुपये दंड आकाराला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहली - रिषभ पंत BCCI चा नियम पाळणार! वनडे स्पर्धा खेळणासाठी संभावित संघात निवड

Tariff Hike: अमेरिकेनंतर आता 'या' देशाने भारतावर ५०% कर लादला; कधी लागू होईल अन् काय परिणाम होणार? वाचा...

Bus and Pickup Accident: कापूस वेचणीस निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! ; 'पिकअप'ला बसची मागून जोरदार धडक

Cancer Specialist: जास्त अंडी खाल्ल्याने खरंच कॅन्सर होतो? बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दिलीप निकम यांनी दिली माहिती

रांगण्याच्या वयात पाण्यात चिमुकल्या जलतरणपटूने वेदाने रचला इतिहास, 10 मिनिटांत 100 मीटर पोहली, Video Viral

SCROLL FOR NEXT