Jalgaon Ashok Ladvanjari News esakal
जळगाव

Jalgaon News: खडसेंवर आरोप करण्याऱ्यांनी आपण काय केले हे तपासावे : अशोक लाडवंजारी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिका व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न एकनाथ खडसे, गुरूमुख जगवानी यांच्यामुळे निर्माण झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी स्वत: काय केले, हे तपासावे, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिले आहे.

(Ashok Ladvanjari statement about Khadse accused should check what they have done jalgaon news)

महापालिकेच्या महासभेत शिवसेनेचे (ठाकरे गट) नितीन लढ्ढा, बंटी जोशी यांनी एकनाथ खडसे व गुरूमुख जगवानी यांच्यावर महापालिका व्यापारी संकुलातील गाळांचा प्रश्‍न निर्माण केल्याचा आरोप केला होता.

त्याला उत्तर देताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी यांनी म्हटले आहे, की एकनाथ खडसे यांच्यावर जे नगरसेवक आरोप करीत आहेत.

त्याच नगरसेवकांनी २००८ मध्ये सुरेशदादा जैन यांनी ३० वर्षांचा करारनामा करून दुकाने देण्याचे आदेश देऊनही त्यांचे म्हणणे न ऐकता करारनामाची मुदत संपल्याचे कारण दाखवून लिलाव करण्याचा घाट घातला होता.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

लिलावात दुकाने अव्वाच्या सव्वा भावात विकण्याची योजना आखली होती. वास्तविक व्यापारी संकुल बांधलेली जागा शासनाच्या मालकीची आहे. महापालिकेला लिलाव करण्याचा व विकण्याचा कोणताही अधिकार नसताना निव्वळ लूट करण्याचा एकमेव उद्देश असलेल्या नगरसेवकांनीच प्रश्‍न लटकवून ठेवला आहे.

मार्केटचा प्रश्‍न सोडविण्याचा एकनाथ खडसे यांनी कायम प्रयत्न केला आहे. आठ वर्षांपासून श्री. खडसे आमदारही नव्हते. मग या काळात शहराचा चेहरामोहरा बदल करणाऱ्या मंत्र्यांनी काय केले, हेही जनतेला कळू द्या.

आरोप करणारे नगरसेवकच राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यासोबत बसत आहेत. त्यांनी आजपर्यंत हा विषय का सोडविला नाही, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. आपण काय केले, हे त्या नगरसेवकांनी तपासावे. उगाच श्री. खडसे यांच्यावर आरोप करू नये, असे अवाहनही लाडवंजारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT