crime news esakal
जळगाव

जळगाव : बहिणीची छेड काढल्यावरून एकावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुलीची छेडखानी केल्याच्या कारणावरून तरुणावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी सुरेश सोनवणे (वय २६), शंकर सोनवणे याने एका मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून मंगळवारी (ता. १७) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास योगेश कोळी, नीलेश राजपूत यांच्यासह इतर दोन हल्लेखोरांनी शंकर सोनवणे दुचाकीने रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानासमोरून जात असताना त्याचा रस्ता अडवला. मुलीचे नाव का घेतले असे, बोलून मारहाण केली. योगेश व नीलेश यांनी चॉपरने शंकरवर वार करून जखमी केले. जखमीवस्थेत तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

गुन्हा दाखल

जखमीने दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी योगेश कोळी, नीलेश राजपूत यांच्यासह इतर दोघा हल्लेखोरांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Odisha Assam Floods: ओडिशा-आसाममध्ये पावसाचा हाहाकार; ७८ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांचा जीव धोक्यात

CWG26 India Medal Tally : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली? ऑस्ट्रेलिया शतकासह अव्वल, तर...

Latest Marathi News Live Update : राधानगरी धरण १०० टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता

Pune-Bengaluru Highway : सहा पदरीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह! मुरगूड रोडनंतर आता गांधी हॉस्पिटलजवळ राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT