Assistant Faujdar Atul Vanjari, Sainath Munde and friends helping Rajendra Khivasara whose shop was burnt in the fire.  esakal
जळगाव

Jalgaon News: सहाय्यक फौजदाराची संवेदनशील फौजदारी! दुःखावर फुंकर...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मारकुट्या, रागीट अन्‌ सतत बोलण्या-वागण्यातून आग ओकणारा खाकीतील पोलिस. कुण्या निराधाराच्या जगण्याचे साधन हिरावून गेल्यावर खडकाला पाझर फुटावा तसा खळखळ वाहू लागताना अनेकानी अनुभवला असेल. (Assistant Faujdar Atul Vanjari financially helped to Rajendra Khivasara whose shop was burnt in fire jalgaon news)

असाच सहाय्यक फौजदार एमआयडीसी पोलिस ठाण्याला लाभला आहे. उदरनिर्वाहचे साधन उद्‌ध्वस्त झालेल्या दिव्यांगाला पुन्हा उभारी देण्यासाठी वाढदिवसाचा खर्च मदत म्हणून देत सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

कुटुंबात वयोवृद्ध आई, निराधार बहीण व भाची, अशा तिघांच्या पालन पोषणाची जबाबदारी राजेंद्र खिंवसरा या दिव्यांग प्रौढावर आहे. स्वतः अविवाहित राहून निरधार बहीण-भाची आणि वयोवृद्ध आईचे संगोपन करण्यासाठी ते लाडवंजारी मंगल कार्यालयाबाहेर छोटेखानी किराणा दुकान चालवितात.

रविवारी (ता. १६) पहाटे त्यांच्या किराणा दुकानवजा टपरीला शॉटसर्किटने आग लागली. त्यात दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. अगोदरच दिव्यांग त्यात परिस्थिती जेमतेम दिवसभर दुकानात राबून जे मिळणार, त्यात घर चालविणार, अशा परिस्थितीत आगीमुळे झालेल्या नुकसानातून खिंवसरा कुटुंबीय हवालदिल झाले होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सहाय्यक फौजदाराची दिलदारी

या विवंचनेत असताना इच्छादेवी पोलिस चौकीची जबाबदारी असलेले सहायक फौजदार अतुल वंजारी यांच्याकडे आगीची नोंद करण्याचा प्रसंग आला. आकस्मिक आगीची नोंद करताना माहिती देणारा व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाची परिस्थिती कळताच वंजारी यांचा पेन होता तिथेच हबकला. दोन दिवसांनी त्यांचाच वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करण्यापेक्षा खिंवसरा यांना मदत केली, तर असा काळजात कारंजे खुलविणारा विचार त्यांना आला.

पार्टीचा खर्च सत्कारणी

अगदी झालेही तसेच. वाढदिवसाला (१९ एप्रिल) चार-दोन मित्र, जे फुलगुच्छ आणतील, जेवणाची (पार्टीची) गळ घालतील, त्यांच्याकडे आपण मन मोकळे करावे, या उद्देशाने त्यांनी सहज सांगून पाहिले. चार-सहा तासांतच मग ठरले खिंवसरा कुटुंबीयांना संकटातून बाहेर काढण्यासाठी भरीव आर्थिक मदत देत उभारी येईल इतकी सोय वंजारी आणि त्यांच्या मित्रांनी उभी केली व प्रत्यक्षात त्यांना बोलावून मदत सोपविली.

अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने राजेंद्र खिंवसरा वारंवार वंजारी यांचा चेहरा अन्‌ त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाणे बघतच ओल्या डोळ्यांनी आभार मानत होते. याप्रसंगी अतुल वंजारी यांच्यासमवेत रोशन पगारिया, पोलिस कर्मचारी साईनाथ मुंडे, पोलिस बॉईज अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT